ठळक बातम्या

नोराने शेअर केला ‘कुसू कुसू’ गाण्यामागचा भयानक अनुभव

बॉलीवूडमधील नोरा फतेही तसे पाहिले, तर आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असते, परंतु सध्या ती चर्चेचा विषय ठरलीय ते तिच्या ‘कुसू कुसू’ या सत्यमेव जयते-२ मधील गाण्यामुळे. नुकतेच हे गाणे रिलीज करण्यात आले असून, रिलीज झाल्यापासूनच या गाण्याने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे आणि त्यातील नोराच्या मूव्हज बद्दल तर काय सांगायचे?
नेहमीप्रमाणे या गाण्यातही नोराच्या घायळ करणाºया अदा पाहायला मिळतात, परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नोरासोबत असे काहीतरी घडले होते, ज्याचा तिने विचारही केला नव्हता. भलेही हे गाणे पाहण्यासाठी कितीही शानदार असू देत, परंतु या गाण्याची पार्श्वभूमी नोरासाठी खूप भयावह ठरली, कारण क्षणभरासाठी तिला वाटले की, कुणीतरी तिचा गळाच दाबत आहे.

या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर करताना नोरा म्हणाली, सेटवर प्रॅक्टीस करताना आम्हाला लहान-सहान जखमा होतच असतात, परंतु जे काही माझ्याबरोबर झाले तो सेटवरचा माझा आतापर्यंतचा सर्वात वाईट अनुभव होता. माझा हार त्याच्या वजनामुळे खूप टाईट होता आणि मी सलग डान्स करत होते त्यामुळे माझ्या गळ्याची त्वचा कापली गेली होती. जेव्हा गाणे संपले तेव्हा मी पाहिले की, माझ्या गळ्याला खूप खोलवर जखमा झाल्या होत्या. मला असे वाटले की, जणू काही कुणीतरी रस्सीने माझा गळा आवळत आहे आणि जमिनीवर खेचत आहे, परंतु आमच्याकडे शूटिंगकरिता खूप मर्यादित वेळ होता. त्यामुळे मी गाणे चित्रीत करणे सुरू ठेवले आणि सिक्वेन्स पूर्ण झाल्यानंतरच ब्रेक घेतला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …

One comment

  1. Pingback: unicc shop