ठळक बातम्या

नृसिंह मंदिराचा दरवाजा १२५ किलो सोन्यानेमढवलेजाणार


हैदराबाद – यदाद्री (तेलंगणा) येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराचे गोपुरम (विशेष द्वार) सोन्याने मढवले जाणार आहे. यासाठी मंदिर व्यवस्थापन 125 किलो सोने गोळा करत आहे. राज्य सरकारनं सोने खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेशी करार केलाय. शुद्ध सोनं मिळावं, यासाठी रिझर्व्ह बँकेशी हा करार करण्यात आला. सरकारने निधी उभारून रिझर्व्ह बँकेकडून सोनेखरेदी करणार असल्याचे म्हटलेआहे.
भगवान विष्णूचा अवतार नृसिंहाचे हे मंदिर ग्रॅनाइट दगडापासून बनवण्यात आलेले देशातील सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिराचे सर्व दरवाजे आणि भिंती चांदीने मढवलेल्या आहेत. यासाठी सुमारे १,७५३ टन चांदी वापरण्यात आली आहे, तर हे मंदिर ९ एकर जागेवर पसरलेलेआहे. या मंदिराच्या विस्तारासाठी १९०० एकर जमीन सरकारने ३०० कोटींना संपादित केली होती.
तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी यदाद्रीतील श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या गोपुरमसाठी मेडचल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने १ कोटी रुपये रोख आणि ७ ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला, तर राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्रीही आपापल्या स्तरावर निधी देत ​​आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पहिले देणगीदार म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या वतीने १.१६ किलो सोने दान केले. तसेच तेलंगणातील अनेक मंत्री त्यांच्या सहकाऱ्यांसह यदाद्रीत होणाऱ्या पूजेच्या रॅलीसाठी पोहोचले आहेत. यामध्येसरथचंद्र रेड्डी, मलकाजगिरी संसद तेरेसा पक्षाचे प्रभारी राजशेखर रेड्डी, माजी आमदार सुधीर रेड्डी, मेडचल मतदारसंघाचे प्रभारी महेंद्र रेड्डी, तेरेसा ने ते डॉ. भद्रा रेड्डी आदींचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

मुंबईत हाय अलर्ट!; खलिस्तान समर्थक गटांकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका

मुंबई – खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट …