नाकावरील जन्मखुणेमुळे ती आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध

रावेन नावाची महिला सोशल मीडिया साइट टिकटॉकवर तिच्या नाकासाठी प्रसिद्ध आहे. डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, तिच्या नाकाच्या शेंड्यावर तपकिरी रंगाची जन्मखूण आहे, ज्यावरून असे दिसते की, नाक वेगळे केले आहे. बरेच लोक त्याची तुलना हरणाचे मूल ‘बांबी’शी करतात. ‘बांबी’ नावाची कार्टून फिल्मही तयार करण्यात आली आहे जी हरणावरच बनवली आहे.
मानवजातीमध्ये अनेकांच्या अंगावर जन्मखुणा असतात. त्यामुळे या जन्मखुणा माणसांकरिता खूप सामान्य ठरतात. याचा अनेक ठिकाणी पूर्वजन्माशी संबंध मानला जातो. अशा एखाद्याच्या चेहºयावर, कोणाच्या हातावर किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागावर जन्मत:च खुणा असतात. जन्माच्या खुणा सहज लक्षात येतात, कारण ते शरीराच्या रंगापेक्षा गडद असतात. हेच कारण आहे की, जर ते शरीराच्या काही विचित्र ठिकाणी झाले तर ते एखाद्या व्यक्तीसाठी लाजिरवाणे ठरू शकते. आज आम्ही एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिच्या नाकावर जन्मखूण आहे आणि लोक तिच्या नाकाची तुलना हरणाशी करून अनेकदा तिला ट्रोल करतात.

रावेन नावाची महिला सोशल मीडिया साइट टिकटॉकरवर तिच्या नाकासाठी प्रसिद्ध आहे. येथील एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, तिच्या नाकाच्या शेड्यांवर तपकिरी रंगाची जन्मखूण आहे, ज्यामुळे तिचे नाक इतरांपेक्षा खूप वेगळे दिसते. बरेच लोक तिची तुलना हरणाचे मूल बांबीशी करतात. ‘बांबी’ नावाची कार्टून फिल्मही तयार करण्यात आली आहे जी हरणावरच बनवली आहे.
लोकांना रावेन खूप आवडते, पण बरेच लोक तिला ट्रोलदेखील करतात, पण रावेनला त्या लोकांचे कधीच वाईट वाटत नाही. रावेन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. रिपोर्टनुसार, तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, ती कधीही तिच्या नाकाची शस्त्रक्रिया करणार नाही, कारण तिला तिचे नाक खूप आवडते आणि तिला तिची जन्मखूणदेखील आवडते. ती म्हणाली की, मी वेगळी दिसते हे मला आवडते.

व्हिडीओसोबत तिने असेही सांगितले की, माणसाच्या आत असे बरेच काही असते जे डोळ्यांनी दिसत नाही. काही लोकांनी तिच्या या म्हणण्याबाबत तिला ट्रोल केले, तर अनेकांनी तिचे कौतुकही केले. लोक तिला गोंडसही म्हणतात. इतकेच नाही तर हरणासारखे दिसणे ही वाईट गोष्ट नाही, ते बांबी हरणासारखे खूप गोंडस असल्याचेही अनेकजण सांगतात. तिच्या व्हिडीओवर एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, तिचे जन्मचिन्ह हे सर्वात गोंडस जन्मचिन्ह आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …