तारा सुतारियाच्या थाय हाय स्लिट गाऊनने वाढवला इंटरनेटचा पारा

तारा सुतारियाचा ‘तडप’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला अहान शेट्टी हा मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. आता ताराने इन्स्टाग्रामवर नुकत्याच केलेल्या फोटोशूटपैकी चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंबरोबर तिने लिहिले आहे, ‘बीती रात…’ त्याचबरोबर तिने डायमंड आणि ब्लॅक हार्टची इमोजीही शेअर केली आहे. याशिवाय तिने हॅशटॅगमध्ये तडपला टॅग केले आहे.
ताराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, आतापर्यंत या फोटोंना पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यावर हजारो लोकांनी कमेंटही केले आहे. काही लोकांनी त्यावर लुकिंग लाइक अ बिलीयन तसेच गॉर्जिअस यांसारख्या कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी हार्ट आणि फायरची इमोजीही शेअर केली आहे. ताराने पहिल्या फोटोत गाऊन घालून पोझ दिलेली आहे. त्याच्याबरोबर तिने इअररिंग्ज व नेकलेस घातला असून, ती खुप सुंदर दिसत आहे. दुसºया फोटोत ती पोझ देताना पाहायला मिळत आहे, तर

तिसºया फोटोत ती हाय स्लिट गाऊनमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. चौथा फोटो क्लोजअप असून, त्यात तिची बॅक आणि ज्वेलरी दिसून येतेये.
तारा सुतारिया सध्या आदर जैनला डेट करत असून, दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली आहे. दोघांचा विवाह कन्फर्म झाल्याची खबर नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …