ठळक बातम्या

काही सेकंदांत १० लोकांचे फास्ट फूड खाते ही व्यक्ती

काही लोक फक्त पोट भरण्यासाठी अन्न खातात. जरी त्यात स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असेल. पण अन्नाला चवीचा खजिना मानणाºया लोकांची जगात कमी नाही. एवढेच नाही तर काही लोक असेही आहेत जे अन्न जास्त प्रमाणात खातात. त्यांचे व्हिडीओही वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आजकाल यूट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटनमधील एक व्यक्ती १० लोकांएवढे फास्ट फूड खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे.
हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवर ‘८’ी५ाङ्मङ्म िनावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. यात दिसणाºया व्यक्तीचे नाव काईल गिब्सन आहे. तो एक स्पर्धात्मक अन्न खाणारा आहे. एखाद्याला आव्हान देऊन तो अन्न खातो. ही व्यक्ती एकटीच मॅकडोनाल्डचे अनेक ख्रिसमसचे जेवण काही सेकंदांत कसे खाते, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण फास्ट फूडमधून त्याने १०,००० कॅलरीज खाल्ल्याचा दावा केला आहे. यामध्ये ६ मोठे फेस्टिव्ह बर्गर, ८ फेस्टिव्ह पाई, २ चीझ स्टॉक बॉक्स आणि २ सेलिब्रेशन मॅकफ्लरीज डेझर्ट्सचा समावेश होता. हा ८ मिनिटांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटू शकते की, कोणी इतके फास्ट फूड इतक्या लवकर कसे खाऊ शकते. जरी त्याला हे सर्व खाण्यासाठी २४ मिनिटे लागली. त्याचा हा व्हिडीओ आतापर्यंत २९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
ते खाल्ल्यानंतर तो म्हणाला की, हे सोपे काम आहे. काइल गिब्सन अनेक प्रकारच्या खाद्य स्पर्धेत भाग घेतो. यासाठी तो जगातील विविध देशांमध्ये जाण्याची संधी सोडत नाही. तो असेही सांगतो की, तो रोज हेल्दी फूड खातो आणि रोज व्यायामही करतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …