मैत्री म्हटली की, एकमेकांसाठी जीव देणाºया मित्रांची आपण व्याख्या करतो; मात्र बिग बॉसच्या घरात वरवर चांगले वाटणारे हे मित्र टास्कसाठी एकमेकांचा जीवदेखील घेतील, अशी परिस्थिती असते; पण बिग बॉस मराठी-३च्या घरात एक अशी स्पर्धक आहे, जी मैत्रिण म्हणून प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल! ती स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. नुकत्याच झालेल्या टेम्पटेशन रूम टास्कमध्ये जोडीदार उत्कर्ष शिंदेला संधी देऊन मीराने पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचा आयाम रचला. बिग बॉस मराठी-३च्या पहिल्याच आठवड्यात मीराला टेम्पटेशन रूममध्ये जाण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी देखील मीराने कॅप्टन बनलेल्या उत्कर्ष शिंदेची कॅप्टनशीप हिरावून घेत, स्वत:ला सेव्ह करण्याचे टेम्पटेशन स्वीकारले नव्हते, तेव्हापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातली अनेक समीकरणं बदलली आहेत; पण तरी देखील मीराने खेळापेक्षा मैत्रीच्या नात्याला अधिक महत्त्व दिलेलं दिसून आले.
बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच मीरा चर्चेचा विषय ठरली आहे. एरवी टास्क जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करणारी मीरा घरातल्या सदस्यांसोबत कीतीही वाद घालताना दिसली, तरी मित्रांसाठी विकेंडच्या वारमध्ये महेश मांजरेकर सरांचा ओरडा खाण्यासाठी देखील तयार असते. मीराचा हाच गुण तिच्या चाहत्यांना आवडत आहे.
अवश्य वाचा
तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट
कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …
One comment
Pingback: buy psilocybin mushrooms united states