वॉशिंग्टन – अमेरिकेच्या मिशिगनमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने हा गोळीबार केला, ज्यात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर किमान ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर १५ वर्षीय हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेत १६ वर्षीय मुलगा आणि १४-१७ वर्षांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. तर, एका शिक्षकासह इतर आठ जण जखमी झाले. आॅकलंड काऊंटी शेरीफ कार्यालयाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, डेट्रॉइटच्या उत्तरेस असलेल्या आॅक्सफर्ड हायस्कूलमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. अधिकाºयांनी शाळेतून अनेक रिकामी काडतुसेही जप्त केली. सुमारे १५-२० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. या घटनेत हल्लेखोर एकटाच होता; पण अद्याप त्याच्या या गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. मी आॅक्सफर्ड, मिशिगन घटनेत प्रियजन गमावल्याबद्दल अकल्पनीय दु:ख अनुभवत असलेल्या कुटुंबांसोबत उभा आहे. शाळेतील या दु:खद गोळीबाराच्या घटनेबाबत मी माझ्या टीमच्या संपर्कात आहे, असे बायडन म्हणाले.
अवश्य वाचा
मुंबईत हाय अलर्ट!; खलिस्तान समर्थक गटांकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका
मुंबई – खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट …