ठळक बातम्या

अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर होणार दाखल

अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट ‘बॉब बिस्वास’च्या प्रदर्शनाची तारीख आणि ठिकाण आता निश्चित झाले आहे. चित्रपटगृहे जरी सुरू झाली असली तरी अभिषेकचा हा चित्रपट थेट

ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट येत्या ३ डिसेंबर रोजी दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिया अन्नपूर्णा घोषने केले असून, या चित्रपटाची निर्मिती
शाहरूख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि सुजॉय घोष यांनी केली आहे.

‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट मुख्यत्वे सुजॉय घोष यांचा हिट चित्रपट कहानीचा स्पिन आॅफ आहे, ज्यात या चित्रपटातील चर्चित व्यक्तिरेखा ‘बॉब बिस्वास’ची बॅक स्टोरी दाखवण्यात येणार
आहे. २०१२ मध्ये आलेल्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटात विद्या बालनने मुख्य भूमिका साकारली होती, तर कॉन्ट्रेक्ट किलर बॉबची व्यक्तिरेखा शाश्वत चॅटर्जी यांनी साकारली होती. या

चित्रपटातील या व्यक्तिरेखेचा मोनोलॉग एक मिनट…खूप लोकप्रिय झाला होता, तो जे खून करण्यापूर्वी म्हणतो. ‘बॉब बिस्वास’चे शूटिंग कोलकातामध्ये करण्यात आले आहे. या
क्राईम ड्रामामध्ये बॉबचे दुहेरी आयुष्य दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंग फिमेल लीडमध्ये दिसून येणार आहे. दिया अन्नपूर्णा घोष हिचा हा पहिलाच चित्रपट आहे.

याबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, बॉब बिस्वास डिझाईन करण्याचा एक शानदार अनुभव मला मिळाला आहे. हा एक क्राईम ड्रामा आहे. या चित्रपटात एक प्रेमकथा मांडण्यात
आली आहे. या चित्रपटाकरिता मला अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा यांचा एक शानदार सेट मिळाला आहे. ज्यांनी या चित्रपटासाठी झोकून देऊन काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

प्रभासने ‘आदिपुरुष’साठी घेतलीये इतकी मोठी रक्कम?

फिल्म स्टार्सबद्दल बोलायचे झाले, तर काही असे आहेत, ज्यांच्यावर फिल्ममेकर्सला कमालीचा विश्वास असतो. हे स्टार्स …