Suzuki ची नवीन स्कूटर Avenis झाली लाँच, डिजिटल मीटरवर WhatsApp-Missed Call अलर्ट.

सुझुकी मोटरसायकल इंडियाने (Suzuki Motorcycle India), गुरूवारी भारतीय बाजारात आपली नवीन स्कूटर Suzuki Avenis लाँच केली. याआधी असे मानले जात होते की कंपनी या स्कूटरच्या लाँचसह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करेल, आणि ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल. परंतु, कंपनीने BS-6 अनुरूप 125cc पेट्रोल इंजिनसह ही स्कूटर उतरवली आहे. या स्पोर्टी 125cc स्कूटरसह, कंपनी तरुण खरेदीदारांना आकर्षित करू इच्छित आहे. भारतीय बाजारपेठेत Suzuki Avenis ची स्पर्धा TVS Ntorq 125,Hero Maestro Edge 125 आणि Aprillia SR 125 अशा शानदार स्कूटरशी होईल.

कंपनीने Suzuki Avenis ला अतिशय स्पोर्टी लूक दिले आहे. त्याची डिझाइन TVS NTorq ला मोठ्या प्रमाणात आव्हान देते. यामध्ये हँडलवरील हेडलॅम्प ऐवजी समोरच्या बॉडीच्या मध्यभागी दिलेला आहे, जो कुठेतरी NTorq सारखा आहे. त्याचबरोबर सुझुकीने या नवीन स्कूटरसाठी स्वतःच्या Access 125 आणि Burgman Street मधून अनेक फीचर्स घेतले आहेत. 125cc Suzuki Avenis स्कूटर Caller ID, व्हॉट्सअॅप अलर्ट, स्पीड एक्सीडिंग वॉर्निंग, फोन बॅटरी लेव्हल डिस्प्ले आणि एखाद्या ठिकाणी पोहोचण्याची अंदाजे वेळ, यांसारख्या शानदार फीचर्ससह येते. ही स्कूटर iOS आणि Android प्लॅटफॉर्मशी कनेक्टेड आहे. याशिवाय स्कूटरमध्ये बॉडी माउंटेड एलईडी, मोठी स्टोरेज स्पेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी टेल लॅम्प, स्पोर्टी मफलर कव्हर, अलॉय व्हील, आकर्षक ग्राफिक्स, साइड स्टँड लॉक, इंजिन किल स्विच, ड्युअल लगेज हुक आणि फ्रंट रॅक स्टोरेज असे फीचर्सही आहेत. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता ५.२ लिटर असून सस्पेन्शनसाठी स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला स्विंग आर्म सस्पेन्शन दिले आहे.

स्कूटरचे 125cc क्षमतेचे फ्युएल-इंजेक्टेड इंजिन 8.6 bhp पॉवर आणि 10Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने ९०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Suzuki Avenis लाँच केली आहे. ही स्कूटर २ एडिशनमध्ये आली आहे. याच्या, बेसिक राइड कनेक्ट एडिशनची किंमत ८६,७०० रुपये (एक्स-शोरुम) आहे. तर, रेस एडिशनची एक्स-शोरूम किंमत ८७,००० रुपये आहे. यातील रेस एडिशनवर सुझुकी रेसिंग ग्राफिक्स मिळतात.. सुझुकी मोटरसायकल इंडिया डिसेंबरच्या मध्यापासून Suzuki Avenis स्कूटरची विक्री सुरू करेल.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …