स्कोडा कंपनीने सोमवारी भारतीय बाजारात आपल्या मध्यम आकाराची सेदान रॅपिड कार सादर केली. तिची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. स्कोडा ऑटो इंडियाने म्हटले आहे, की रॅपिड मॅट, कार्बन स्टील मॅट रंगात उपलब्ध होईल. मॅन्युअल ट्रान्समिशन एडिशनची किंमत ११.९९ लाख रुपये आहे. दुसरीकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एडिशनची किंमत १३.४९ लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड निर्देशक जॅक हाॅलिस यांनी म्हटले आहे, की २०११ मध्ये सादर केल्यानंतर एक लाखांपेक्षा अधिक ग्राहकांबरोबर रॅपिड भारतात यशस्वी ठरली आहे. देशभरातील कार प्रेमींना ती खूपच आवडली आहे. ते म्हणाले, की ही यशोगाथा पुढे नेत कंपनीला भारतात रॅपिड मॅट एडिशन सादर करताना आनंद होत आहे. कार आणि बाईक विश्वाचे वार्तांकन करणाऱ्या ऑटो वेबसाईट ‘रशलेन’ च्या वृत्तानुसार या कारच्या सुविधांमध्ये एकमेव मोठा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे. इतर फिचर्स टाॅप- स्पेक मोंटे कार्लो ट्रिमप्रमाणे असेल. त्यात ८ इंच अँड्राईड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पाॅवर अॅडजस्टिंग आणि फोल्डिंग आरसा, ऑटो हेडलॅम्प आणि व्हायपर, प्रोजेक्टर लायटिंगसह एलईडी डीआरएल आणि एक के बरोबर पाॅवर विंडोही आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …