ठळक बातम्या

Ducati ची नवी सुपरबाइक भारतात लॉन्च

नवीन Ducati Panigale V4 SP चे फिचर्स Panigale V4 S पेक्षा वेगळे आहेत. सुपरबाईकमध्ये डेडिकेटेड लाइवरी, बिलेट-मेकॅनाइज्ड स्टीयरिंग हेड, स्वतंत्र उपकरणे आणि रेस-ट्यून केलेले इंजिन आहे. बाइक नवीन “विंटर टेस्ट” लायवरीसह आहे. MotoGP आणि SBK चॅम्पियनशिपच्या प्री-सीझन चाचणीमध्ये वापरल्या गेलेल्या डुकाटी कोर्स बाइकपासून प्रेरित आहे. या वैशिष्ट्यांमुळेच Panigale V4 S पेक्षा वेगळी आहे. या बाईकला १,१०३ सीसी Desmosedici Stradale इंजिन आहे. हे मोटोजीपीकडून प्राप्त डेस्मोड्रोमिक वितरणासह ९० डिग्री V4 इंजिन आहे. हे इंजिन १३ हजार rpm वर २१४ hp ची कमाल पॉवर आणि ९ हजार ५०० rpm वर १२.६ Kgm पीक टॉर्क जनरेट करते.

कार्बन फ्रंट मडगार्ड आणि बिलेट अ‍ॅल्युमिनियममधील अ‍ॅडजस्टेबल रायडर फूटपेगचा समावेश आहे. सीटवरील रायडरच्या स्थितीनुसार फूटपेग सेट केला जाऊ शकतो. लांब पल्ल्याच्या प्रवासाठी बाइकमध्ये ओपन कार्बन क्लच कव्हर, लायसन्स प्लेट होल्डर आणि आरसे काढण्यासाठी कॅप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यासोबतच डुकाटी डेटा अ‍ॅनालायझर+ (DDA+) टेलिमेट्री किट जीपीएस मॉड्यूलसह ​​आहे. यामुळे चालकाला मार्गिकेचे व्यवस्थित नियोजन करता येते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …