ठळक बातम्या

…तरच बांगलादेश सुपर-१२ खेळू शकतो

…तरच बांगलादेश सुपर-१२ खेळू शकतो

अल अमेरात – बांगलादेशला सुपर-१२मध्ये पोहचण्याच्या आपल्या अपेक्षा कायम राखण्यासाठी गुरुवारी काहीही करून पापुआ न्यू गिनीवर मोठा विजय मिळवावा लागेल. मंगळवारी ओमानवरील विजयाने बांगलादेशने आपल्या विजयी मोहिमेला पटरीवर आणले.

बांगलादेशला पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला; पण महमुदुल्लाहच्या नेतृत्वातील संघाने मंगळवारी रात्री ओमानचा २६ धावांनी पराभव करत चांगले पुनरागमन केले. बांगलादेश या विजयानंतर ही गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून, त्यांची धावगती +०.५०० आहे. पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या विजयाने त्यांना दोन गुण मिळतील; पण ओमानविरुद्ध स्कॉटलंडने विजय मिळवावा अशी प्रार्थनाही त्यांना करावी लागणार आहे. स्कॉटलंडने आपले दोन्ही सामने जिंकत या गटातून सुपर-१२मध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे. बांगलादेशसाठी चांगली बाब अशी की, त्यांचे काही फलंदाज फॉर्मात आलेत. ओमानविरुद्ध सलामी फलंदाज मोहम्मद नईम ६४ धावा करत सामनावीर राहिला; पण त्याला सुरुवातीला लिट्टन दासकडून मदत मिळण्याची गरज आहे. मधल्या फळीचे अपयश बांगलादेशसाठी चिंतेचा विषय राहिलेले आहे. ओमानविरुद्ध मेहदी हसनला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्यात आले; पण तो चालला नाही. कर्णधार महमुदुल्लाह, नुरुल हसन व अफीफ हुसैनलाही धावा कराव्या लागतील. बांगलादेशसाठी अष्टपैलू शाकिब अल हसनची भूमिका महत्त्वाची असेल. त्याने मागील सामन्यात दोन्ही विभागांत चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत मुस्ताफिजुर रहमानने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार विकेट मिळवल्या. ऑफ स्पिनर मेहदी हसन व शाकिबला मधल्या काळात प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करावा लागेल. दुसरीकडे, असद वलाच्या नेतृत्त्वातील पापुआ न्यू गिनीच्या संघाने आपले दोन्ही सामने गमावले असून, ते सुपर-१२च्या शर्यतीतून बाहेर पडलेत. ते प्रभावशाली कामगिरी करत स्पर्धेचा शेवट करू पाहतील. वलाने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याला आणखीन मोठी खेळी करण्याची गरज आहे. इतर फलंदाजांची त्याला मदत मिळायला हवी. बांगलागदेशच्या अनुभवी फलंदाजांवर अंकुश लावण्यासाठी पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांना योग्य लाइन व लेग्थने गोलंदाजी करायला हवी. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *