मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीने मालदीव आणि दुबईमध्ये बॉलिवूड कलाकारांकडून वसुली केल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर वानखेडे यांनी मी कधी दुबईला गेलोच नाही. मलिक खोटारडे असून त्यांच्या विरोधात मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) आरोपांच्या फैरी झाडण्याकामी अद्याप थांबलेले नाहीत. ते एनसीबीवर नवनवीन आरोप करीत आहेत. आता तर त्यांनी एनसीबीचे विड्टाागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवीन आरोप केला आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्या वेळी समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे तसेच त्यांची लेडी डॉन दुबई, मालदीवमध्ये गेली होती का? याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच त्यांनी मालदीवमधील फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते, असा दावा केला आहे. यावर वानखेडे यांनी मलिक यांचे नवे आरोप फेटाळून लावत आपण कधी दुबईला गेलोच नाही. मलिक खोटारडे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असे उत्तर त्यांनी मलिकांच्या आरोपांवर दिले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली असून वानखेडेंची बहीण यास्मिन वानखेडे या मनसेच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर लेडी डॉन म्हणत मलिक यांनी आरोप केल्याने मनसेदेखील आक्रमक झाली आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …