ठळक बातम्या

ॲशेस मालिका : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला १४७ धावांत गुंडाळले

* कर्णधार कमिन्सचे ५ बळी
ब्रिस्बेन – ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या अ­ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी ब्रिस्बेनमध्येसुरू झाली आहे. या कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडचा कर्णधार जो रूटने घेतला होता, मात्र त्याच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांनी पाणी फेरले. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांनी इंग्लंड संघाला १४७ धावांत गुंडाळले. यात प्रथमच कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कमिन्सने१२७ वर्षापूर्वीच्या एका विक्रमची बरोबरी केली. इंग्लंडचा डाव आटोपताच पाऊस सुरु झाला. यामुळे खराब हवामान आणि ओल्या आउटफिल्डमुळे तिसरे सत्र खेळता आले नाही. आता ऑस्ट्रेलियाला गुरुवारी सकाळी आपला पहिला डाव सुरू करेल.
क्रिकेट विश्वाचे लक्ष लागुन असलेल्या ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील ॲशेस कसोटी मालिकेला बुधवारी सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेनाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र रूटचा निर्णय चुकीचा ठरला. मिशेल स्टार्कनेपहिल्याच चेंडूवर सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद केले. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच डेव्हीड मलानला हेजलवूडने बाद केले. त्यानंतर हेजलवूडनेच इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानेयावर्षीजबरदस्त फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूटला शून्यावर आऊट केले. त्यामुळेसहा षटकात इंग्लंडची आवस्था ३ बाद ११ अशी झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार कमिन्सनेअष्टपैलू बेन स्टोक्सला मार्नस लॅबुशेनच्या हाती झेल देण्यास भागापाडून पहिली विकेट घेतली. त्यावेळी इंग्लडची धावसंख्या चार विकेटवर २९ होती. सलामीवीर हसीब हमीदनेधावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करत उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ५९ पर्यंत नेली, परंतु दुसऱ्या सत्रात कमिन्सच्या चेंडूवर दुसऱ्या स्लीपमध्येस्टीव्ह स्मिथकडेझेल देत हमीद बाद झाला. त्याने२५ धावा केल्या. पोप आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून काही काळ पडझड थांबवली. स्टार्कनेबटलरला बाद करून ही भागीदारी तोडली. जोस बटलरनेसर्वाधिक ३९ धावा केल्या. ग्रीनच्या चेंडूवर ऑली पोप झेलबाद झाला. पोपने३५ धावांचे योगदान दिले.ग्रीनची ही पहिलीच कसोटी विकेट होती. त्यानंतर कमिन्सनेऑली रॉबिन्सन (०), मार्क वुड (८) आणि ख्रिस वोक्स (२१) यांना बाद करून इंग्लंडचा डाव संपवला. ख्रिस वोक्सनेनवव्या विकेटसाठी मार्क वूडसोबत २२ धावांची भागिदारी केल्याकरत संघाला १४७ पर्यंत पोहोचले. इंग्लंडचे आवघे चार फलंदाजच धावांचा दुहेरी अंक गाठु शकले. इंग्लंडचा डाव संपल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला, मात्र त्यानंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा पंचांनी केली. कमिन्सने३८ धावांत पाच बळी घेण्याची किमया केली. याशिवाय स्टार्क, जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी २, तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीननेएक विकेट घेतली.
……………….
बॉक्स … कर्णधार कमिन्सची कमाल
पॅट कमिन्स सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.ऑस्ट्रेलियाकडून रेमंड लिंडवाल यांनी भारताविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्येकर्णधारपद सांभाळले होते.त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झालेला कमिन्स हा पहिलाच जलदगती गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सनेसर्वात जास्त ५ विकेट्स घेतल्या. कर्णधार म्हणून पदार्पणातील मॅचमध्ये५ विकेट्स घेणारा कमिन्स हा दुसराच ऑस्ट्रेलियन आहे. याआधी १२७ वर्षांपूर्वी जॉफ गिफन यांनी ही कामगिरी केली होती. त्यांनी १८९४ साली इंग्लंड विरूद्ध ५५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
……………….
योगायोग
१९३६ नंतर ऑस्ट्रेलियात ॲशेस मालिकेत पहिल्याच चेंडूवर विकेट पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. योगायोगा म्हणजे१९३६ साली ॲशेस मालिकेतील पहिला सामना देखील गाबा येथे खेळला गेला होता. त्यावेळी पहिल्या चेंडूवर इंग्लंडने विकेट गमावली आणि त्यांची धावसंख्या तीन बाद २० अशी होती, यानंतर मात्र इंग्लंडनेचांगलेपुनरागमन करत सामना जिंकला होता. या सामन्यात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हेअनुभवी गोलंदाज संघाबाहेर असल्यामुळे इंग्लडची गोलंदाजी काहीशी कमजोर दिसत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …