ब्रिस्बेन – येथे झालेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर एकतर्फीविजय मिळवला. ९ गडी राखून ऑस्ट्रेलियानेसामना जिंकला. नॅथन लियॉननेकसोटी कारकीर्दीत ४०० हून अधिक बळी घेत गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला. कर्णधार जो रुटची विक्रमी खेळी आणि डेव्हिड मलानसोबत झालेली भागिदारीदेखील इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकली नाही. कसोटीच्या चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल आला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कामगिरी या कसोटीत प्रभावी ठरली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या २० धावांचेलक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एलेक्स कॅरी याची विकेट गमावत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने या विजयाच्या बळावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेण्या बरोबर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १२ गुणांची कमाई केली.
सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांच्या माऱ्यापुढेइंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात १४७ धावा करता आल्या.
पाहुण्या संघाच्या या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेआपल्या पहिला डावात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (९६), लाबुशाने(७४) आणि ट्रेव्हिस हेडच्या १५२ धावांची खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४२५ धावांचा डोंगर उभारत २७८ धावांची आघाडी घेतली. कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलान यांनी तिसऱ्या दिवशी दीड शतकी भागीदारी करत इंग्लंडला २ बाद २२० धावांपर्यंत मजल मारून दिली होती. ८० च्या फेऱ्यात उभे असलेले रूट व मलान यांची जोडी चौथ्या दिवशी आघाडी वाढवण्याच्या इराद्यानेमैदानात उतरली, पण रूट व मलान यांची जोडी प्रभाव पाडण्यात कमी पडली. मलानला बाद करत लियॉनने कारकीर्दीतला ४०० वा बळी घेतला. त्याच्या ८२ धावांच्या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. त्यानंतर अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने कर्णधार रूटची १० चौकारांनी त्याची ८९ धावांची खेळी संपुष्टात आली. रूट, मलान बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव नाट्यमरित्या कोसळला. उर्वरित सहा फलंदाज केवळ ६८ धावांची भर घालू शकले. बेन स्टोक्स (१४) , जोस बटलर (२३) , क्रिस वोक्स (१६) फार काळ प्रतिकारकरू शकलेनाही. लियॉनच्या फिरकी पुढे इंग्लंडचा संघाची चांगलीच भंबेरी उडाली.लियॉनने चार बळी घेत इंग्लंडचे शेपूट छाटले आणि त्यांचा डाव २९७ धावांवर संपुष्टात आणला.लियॉनला साथ देत ग्रीन व कर्णधार पॅट कमिन्सने प्रत्येकी २ बळी घेतले.
विजयासाठी मिळालेलेकेवळ २० धावांचेलक्ष यजमान संघानेनऊ गडी राखून सहज पार केले. पहिल्या डावात फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरला चेंडू लागला होता.त्यामुळे तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरू शकला नाही.तसेच दुसऱ्या डावात दुखापत आणखी बळावू नये म्हणून त्याला सलामीसाठी पाठवण्यात आले नाही.त्याच्या बदल्यात यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीला मार्कस हॅरीस सोबत फलंदाजीला उतरला. दोन वेळा मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आणि ९ धावांवर बाद झाला. उभय संघातील दुसरी दिवस-रात्र कसोटी ॲडलेडमध्येगुरवारपासून सुरू होईल.
* ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉनने४०० बळी मिळवण्याची कामगिरी अवघ्या १०१ कसोटी सामन्यात केली आहे. त्याने २०११ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध डेब्यू सामना खेळला होता. त्याच्या नावावर सध्या ४०४ बळी जमा आहे. शेन वॉर्न ७०८ बळींनी पहिल्या आणि ग्लेन मॅकग्रा ५६३ बळींनी द्वितीय स्थानावर उभे आहे.४०० बळी घेणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तो एकूण १७ वा आणि सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे.श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरच्या नावावर सर्वाधिक ८०० बळी जमा आहे.लियॉनच्या पुढे आता केवळ इंग्लंडचा जेम्स अँडरसन (६३२) , स्टुअर्ट ब्रॉड (५२४) आणि भारताचा आर.अश्विन (४२७) पुढे उभे आहे.
* सामन्यातील संपूर्ण मानधन कापले
दारूण पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या इंग्लंडला दुहेरी धक्का बसला आहे.कारण, षटकांची गती धिमी राखल्यामुळे संपूर्ण इंग्लंड संघाचे शंभर टक्के मानधन कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून त्यांच्या खात्यातून पाच गुण कमी करण्यात आले आहे.नियमित कालावधीत पाच षटके कमी टाकल्यामुळे सामनाधिकारी डेविड बून यांनी कठोर निर्णय घेतला.प्रत्येक षटकामागे २० टक्के असे एकूण पाच षटकांनूसार १०० टक्के कापण्यात आले.तसेच प्रत्येक षटकामागे एक गुण ही कमी करण्यात आला.
* ट्रेव्हिस हेडला दंड
आयसीसी आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी सामनाधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेडला दंड ठोठावत १५ टक्के रक्कम मानधनातून कापण्याचा निर्णय घेतला.तसेच त्याच्या खात्यात एक नकारात्मक गुण जमा करण्यात आला.बेन स्टोक्स विरोधात त्याने अपमानास्पद शब्दांची शेरेबाजी केली होती.
* पाचवी कसोटी होबार्टला
विलगीकरणामुळे पर्थकडून हिसकावून घेण्यात आलेली अंतिम व पाचवी कसोटीचे यजमान पद होबार्टला देण्यात आले आहे.त्यानूसार १४ जानेवारीपासून होबार्टमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळवण्यात येईल.यानिमित्ताने पहिल्यांदा ॲशेज कसोटी खेळवण्याचा मान होबार्टला मिळाला आहे.तसेच २०१६ नंतरची होबार्टमधील पहिलीच कसोटी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भारत-पाकिस्तानला फटका
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये यजमान संघानेइंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा भारत-पाकिस्तानला फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलियानेया विजयानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान या आशियाईटीमला मागेटाकले आहे. या पॉईट टेबलमध्येश्रीलंका नंबर वनवर आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे पर्सेंटेज पॉईंट्स समान आहेत, पण श्रीलंकेचे पॉईंट्स हे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहेत. पाकिस्तानची टीम ७५ पॉईंट्ससह तिसऱ्या तर टीम इंडिया ५८.३३ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज, इंग्लड, न्यूझीलंड आणि बांगलादेश अशी क्रमवारी आहे.