ठळक बातम्या

 ॲशेस मालिका : ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात भक्कम आघाडी

दुसरा दिवसअखेर ७ बाद ३४३
हेडचे नाबाद शतक, वॉर्नर, लबुशानेचे अर्धशतक
ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिला डावात इंग्लंडला बुधवारी १४७ धावांमध्येगुंडाळल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियानेफलंदाजीतही चोख प्रत्यूत्तर दिले आहे.मधल्या फळीतील ट्रेव्हिस हेडचेआक्रमक नाबाद शतक, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेन यांच्या अर्धशतकसच्या जोरांवर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ७ बाद ३४३ धावा केल्या. त्यामुळेब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने १९६ धावांची आघाडी घेतली आहे. वॉर्नरच्या ९४ धावांसह ट्रेव्हिस हेडचं (नाबाद ११२) आक्रमक शतक हे दुसऱ्या दिवसाचेवैशिष्ट्य ठरले.
इंग्लंडचा डाव १४७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता.पावसानेदुसऱ्या दिवशी उसंत घेतल्याने ऑस्ट्रेलिया मैदानात उतरली. इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली.डावखुऱ्या वॉर्नरसोबत मार्कस हॅरिस सलामीला उतरला. वेगवान गोलंदाज रॉबिन्सनेऑस्ट्रेलियाला पहिला दणका देत हॅरिसला (३) बाद केले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसरा दिवस गाजवला.१७ धावांवर खेळत असतानाच वॉर्नर सुदैवी ठरला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याला बाद देण्यात आले, पण चेंडू नो बॉल असल्यामुळे पंचांनी त्याला जीवदान दिले. लबुशानेआणि वॉर्नर या जोडीनेइंग्लंडच्या गोलंदाजांचे आक्रमन परतावून लावत दमदार कामगिरी केली. उपहारापर्यंत या दोघांच्या खेळीवर ऑस्ट्रेलियाने १ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारली.दुसऱ्या सत्रात रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्येरोनी बर्न्सने वॉर्नरचा झेल सोडला. त्यानंतर ६० धावांवर वॉर्नरला धावचीत करण्याची संधी इंग्लंडच्या हसीब हमीदनेगमवली. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिचने लबुशानेला बाद करत जोडी फेाडली. लबुशानेने ६ चौकार आणि २ षटकार खेचत ७४ धावा काढल्या. वॉर्नर-लबुशाने यांनी दुसऱ्या गड्यासाठी १५६ धावांची भागीदारी केली. रॉबिन्सनने ५६ व्या षटकांत ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का दिला. माजी कर्णधार स्टीव स्मिथ (१२) कमाल दाखवूशकला नाही. तीन जीवनदानाचा फायदा घेत शतकाकडे कूच करणाऱ्या वॉर्नरला (९४) बाद केले. वॉर्नरचे २५ वेशतक फक्त ६ धावाने हुकले.त्याने कॅमेरून ग्रीनला भोपळाही फोड दिला नाही. तर ॲलेक्स कॅरीही (१२) मोठेकरू शकला नाही. लबूशानेबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली होती. १ बाद १६६ वरुन ५ बाद १९४ अशी अवस्था झाली. ऑस्ट्रेलियाची निम्मी टीम परतल्यानंतर इंग्लंडनं मॅचमध्ये पुनरागमन केले असेवाटत होते. त्यावेळी पाचव्या क्रमांकावर आलेल्या हेडने प्रतिहल्ला केला. त्यानेदबावात न खेळता मुक्तपणेफटकेबाजी केली. ५१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या हेडने नंतर आणखी आक्रमक खेळी केली. त्यानेत्याचे कसोटी कारकिर्दीमधील तिसरे शतक फक्त ८५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. या खेळीत हेडने१२ चौकार आणि २ षटकार लगावले. ॲशेसमध्ये सर्वात जलद शतक ठोकरणार हेड तिसरा खेळाडू ठरला आहे.५१ चेंडूंत अर्धशतक झळकावणाऱ्या हेडने पुढील ५० धावा केवळ ३४ चेंडूंत फटकावल्या. त्याचे कारकीर्दीतले हे तिसरे कसोटी शतक आहे. ट्रेव्हिस हेडने ८८ चेंडूंत झळकावलेले शतक ॲशेसमधील सर्वात तिसरे वेगवान शतक ठरले. १९०२ मध्ये ओव्हलवर इंग्लंडच्या गिलबर्ट जॅसप यांनी अवघ्या ७६ चेंडूंत शतकाला गवसणी घातली होती. त्यानंतर या पंक्तीत ॲडम गिलख्रिस्ट दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने २००६ मध्ये पर्थवर ५७ चेंडूंत शतकाची नोंद केली होती. हेडनंतर इंग्लंडचे महान फलंदाज इयान बॉथम (८६) चेंडूत यांचा क्रमांक लागतो. कर्णधार कमिन्सची (१२) खेळी फार काळ लांबली नाही.हेड व कमिन्स जोडीने सातव्या गड्यासाठी ७० धावा जोडल्या. हेडच्या या नाबाद शतकामुळे ऑस्ट्रेलियानेदुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ७ बाद ३४३ पर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेड ११२ आणि मिचेल स्टार्क१० धावांवर खेळत होते.

  वॉर्नरची ‘ती’ पंरपरा खंडीत
ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नर गुरूवारी झालेल्या खेळात वॉर्नर नशीबवान ठरला. तो १७ धावांवर होता तेव्हा बेन स्टोक्सच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला होता. पण, तो नो बॉल होता. त्याचा फायदा वॉर्नरला झाला. वॉर्नर गुरुवारी पाचव्यांदा नो बॉलवर आऊट झाला. त्यानं नो बॉलवर आऊट झाल्यानंतर प्रत्येक वेळी मोठा स्कोअर केला आहे. २०१४ साली वॉर्नर भारताविरुद्ध पहिल्यांदा नो बॉलवर आऊट झाला होता. त्यावेळी तो ६६ धावांवर खेळत होता. वॉर्नरनं पुढे१४५ धावांची खेळी केली. २०१६ साली पाकिस्तान विरुद्ध ८१ धावांवर त्याला जीवदान मिळाले. त्यावेळी त्याने १४४ धावा केल्या.२०१७ साली इंग्लंड विरुद्ध ९९ रन्सवर तो वाचला. त्याने १०३ रन काढले. २०१९ साली पाकिस्तान विरुद्ध त्याला पुन्हा एकदा ५६ धावांवर नो बॉलनेसाथ दिली. त्या मॅचमध्ये वॉर्नरने१५४ धावा कुटल्या होत्या. ब्रिस्बेन टेस्टपूर्वीतो चार वेळा नो बॉलवर आऊट झाला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी त्याने शतक झळकावले. यंदा ती परंपरा तुटली. वॉर्नरचं शतक फक्त ६ धावांनी हुकले. त्याला रॉबिन्सनने आऊट केले.

 

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …