ॲशेस : इंग्लंड पराभवाच्या छायेत

मेलबर्न – अ­ॅडलेड येथे सुरू असलेल्या ॲशेस कसोटीत विजय ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीपथात आला आहे. पहिल्या दिवसापासून या डे-नाईट कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंच्या ४ बाद ८६ धावा झाल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी ३८६ धावांची आवश्यकता आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डेव्हिड मलान यांच्यासारखे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था बिकट आहे.
या स्थितीतून सोमवारी इंग्लंडने कसोटी सामना वाचवला, तरी ती मोठी गोष्ट ठरेल. ऑस्ट्रेलियाने रविवारी एक बाद ४५ वरून डाव पुढे सुरू केल्यानंतर दुसऱ्या डावात ९ विकेट गमावून २३० धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन आणि ट्रेव्हिड हेडने अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडचे दोन्ही सलामीवर रोरी बर्न्स (३४) आणि हासीब हमीद (०) तंबूत परतले आहेत. सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाजांची कसोटी असेल. अ­ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी आधीच इंग्लंडने गमावली आहे. मालिकेत ते १-० ने पिछाडीवर आहेत. मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे. इंग्लंडचा पहिला डाव २३६ धावांत आटोपला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …