ॲक्टींगच्या दुनियेत पुन्हा एंट्री केल्याने खुश आहे दिव्या खोसला कुमार

अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट सत्यमेव जयते-२ प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या ॲक्शन ड्रामा चित्रपटात जॉन अब्राहमबरोबर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे दिव्याने प्रदीर्घ काळानंतर ॲक्टींगच्या दुनियेत पाऊल टाकले आहे.

यापूर्वी ती २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपट अब तुम्हारे हवाले वतन साथियोंमध्ये दिसून आली होती. त्यानंतर तिने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यारियां आणि सनम रेचे दिग्दर्शन केले होते, परंतु आता पुन्हा एकदा तिने आपला मोर्चा अभिनयाच्या दिशेने वळवला आहे. अनेक वर्षांनी पुन्हा अभिनयात एंट्री करत असल्याबाबत बोलताना दिव्या म्हणाली, ‘मी या चित्रपटाबद्दल खूप उत्साहित आहे की, मला इतकी चांगली संधी मिळाली आहे. खरेतर यापूर्वी मी एक शॉर्टफिल्म बुलबुल केली होती. यामध्ये मिलापने माझी व्यक्तिरेखा अतिशय उत्कृष्टपणे सादर केली आहे. कदाचित मीदेखील स्वत:ला स्क्रीनवर अशाप्रकारे प्रेझेंट करण्याचा विचार केला नसता. यातील माझी व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. तसेही आजकाल खूप चांगले कंटेंट बनत आहेत. कोरोनानंतर आता परिस्थितीही खूप सामान्य होत आहे. हा चित्रपट थिएटरसाठी बनत आहे. मला आनंद आहे की, हा चित्रपट आता थिएटरमध्ये दाखल होत आहे.’ या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला यांच्या व्यतिरिक्त भूषण कुमार, निखील अडवाणी, मोनिशा अडवाणी, मनोज बाजपेयी, अनुप सोनी, गौतमी कपूर, दया शंकर सिंग आणि शाद रंधावा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …