८ वर्षांच्या मुलीला जडलाय विचित्र आजार

जगात अनेक लोकांना खूप विचित्र प्रकारचे आजार होतात, ज्याबद्दल लोकांना जाणून आश्चर्य वाटते. अशा आजारांमुळे डॉक्टरही खूप चिंतेत असतात. आजकाल ८ वर्षांच्या मुलीच्या आजाराची खूप चर्चा आहे. रिपोटर््सनुसार, मुलगी चालण्यास असमर्थ आहे. आता तिचे एकच स्वप्न आहे, जे तिला तिच्या बहिणीसोबत पूर्ण करायचे आहे.
एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क, इंग्लंडमध्ये राहणाºया ८ वर्षीय अ‍ॅमेली राऊंडला आनुवंशिक स्पास्टिक पॅराप्लेजिया नावाची एक विचित्र आरोग्य स्थिती आहे, ज्यामुळे तिच्या शरीराला त्रास होतो. मानेखालील खालचा भाग खूपच कमकुवत झाला आहे. ४ वर्षांपूर्वी या आजारामुळे तिच्या मानेखालच्या भागातील नसा कडक व अशक्त झाल्या असून, आता तिला चालता येत नाही.

मोठ्या कष्टाने मुलीच्या पालकांना अमेरिकेतील मिसुरी येथे या आजारावरील उपचाराची माहिती मिळाली, मात्र त्यासाठी एक कोटी रुपये खर्च येणार आहेत. या शस्त्रक्रियेनंतर मुलगी स्वत: चालू शकणार आहे. सध्या, या मुलीची इच्छा आहे की, ती लवकर बरी होऊन तिच्या आई-वडिलांच्या लग्नाला कलवरी म्हणून हजेरी लावेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, मुलीची ३७ वर्षीय आई रोज मूर आणि ३९ वर्षीय वडील जे राऊंड लग्नाच्या १० वर्षांनंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांची मुलगी बरी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. आई-वडिलांनी सांगितले की, १८ महिन्यांपासून मुलगी व्यवस्थित वाढली; पण ती तिच्या इतर मैत्रिणींप्रमाणे स्वत:च्या पायावर उभी राहू शकली नाही. तिच्या आईने सांगितले की, ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे जी केवळ ०.००५% लोकांमध्ये आढळते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …