८ लाख प्लास्टिकच्या बाटल्यांवर तरंगणारे अनोखे रिसॉर्ट

जगात अशी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत जी त्यांच्या सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहेत. या हॉटेल्सचे सौंदर्य पाहून लोक थक्क होतात. ब‍ºयाच वेळा ही हॉटेल्स मौल्यवान वस्तूंनी बांधली जातात जी केवळ खास हॉटेल्ससाठी इतर देशांतून आयात केली जातात. पण आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत जे कोणत्याही इटालियन मार्बलने बनलेले नाही किंवा करोडोंची गुंतवणूक नाही. हे हॉटेल प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या कचºयापासून बनलेले आहे.
आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टमधील एक रिसॉर्ट जगभर प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी बनवलेले हे रिसॉर्ट दिसायला अगदी साधे आहे, पण ते कशापासून बनवले आहे हे जेव्हा लोकांना कळते तेव्हा सगळेच थक्क होतात. अबिदजान शहरात स्थित रिसॉर्ट स्वत:च एक बेट आहे. जे प्लास्टिक कचरा वापरून तयार केले गेले आहे आणि ते प्लास्टिकच्या बाटल्यांवर पाण्यावर तरंगत आहे.

शहराच्या या समुद्रकिनाºयावर प्लास्टिकचा कचरा पाहून फ्रेंच व्यावसायिक एरिक बेकर यांना ही कल्पना आली. या बेट रिसॉर्टचे एकूण वजन सुमारे २०० टन आहे आणि ते समुद्रकिनाºयाजवळ उथळ पाण्यावर बांधले गेले आहे जेणेकरून ते पाण्यावर टिकू शकेल. बेटावर खोल्या, एक रेस्टॉरंट, एक कॅराओके बार आणि दोन स्विमिंग पूल असलेले एक हॉटेल आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, बेटावर एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे इतर रिसॉर्ट्सच्या तुलनेत खूपच कमी आहे. येथे एका रात्रीसाठी ७ हजार रुपये मोजावे लागतात. जर एखाद्याला दिवसा रिसॉर्टमध्ये यायचे असेल, तर त्याला १८०० रुपये द्यावे लागतील. एका आठवड्यात १००हून अधिक पर्यटक या रिसॉर्टला भेट देतात. यामध्ये स्थानिक लोकच नाही, तर इतर देशांतील पर्यटकही आहेत. रिसॉर्टला सौरऊर्जेवरून वीज मिळते आणि शहरापासून जवळ असल्याने शुद्ध पाणीही पुरवले जाते. हे संपूर्ण बेट पर्यावरणपूरक आहे, परंतु बेकर यांना रिसॉर्टमध्ये पर्यटकांनी टाकलेल्या कचºयाचे आधुनिक तंत्र वापरून कंपोस्टमध्ये रूपांतर करावे असे वाटते, ज्याचा वापर बेटावरील वनस्पतींसाठी खत म्हणून केला जाईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …