कोविडच्या काळात बहुतेक लोक फ्लाइटने प्रवास करणे पसंत करतात. कोरोनामुळे लोक कमीत कमी वेळेत प्रवासाचे पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उड्डाण हा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला विमानाने प्रवास करणे खूप कठीण असल्याचे सिद्ध होते. याचे कारण म्हणजे त्याची उंची. होय, व्यक्तीची उंची इतकी आहे की, तो विमानात बसू शकत नाही. २९ वर्षीय ब्यूची उंची ७ फूट १ इंच आहे.
या महाकाय माणसाने विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. त्यानंतर ती व्यक्ती विमानात चढताच सर्व प्रवासी त्याला पाहू लागले. वास्तविक, ब्यूच्या उंचीमुळे तो विमानात बसू शकला नाही. त्याला वाटले की, आता कदाचित तो विमानातून फेकला जाईल. पण नंतर असे काही घडले की, ज्याची कल्पनाही त्याने केली नसेल.
टिकटोकर ब्यू ब्राऊन जॉर्जियाहून नॉर्थ कॅरोलिनाला जाणार होता. त्याची उंची जास्त असल्याने त्याने इमर्जन्सी एक्झिट सीट घेतली. उंचीची समस्या असू शकते हे त्याला माहीत होते, पण विमानात चढल्यावर तो त्याच्या सीटवर बसू शकला नाही. यामुळे लोकांसोबतच खुद्द ब्यू यालाही आता विमानातून उतरवले जाईल, असे वाटले. पण विमान कंपनीने त्याला एक अप्रतिम भेट दिली. कंपनीने त्याचे तिकीट प्रथम श्रेणीत अपग्रेड केले.
ब्यूने ही घटना आॅनलाइन शेअर केली. टिकटॉकवर त्यांचे १७ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी अपलोड केलेला व्हिडीओ आतापर्यंत ६० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अटलांटा येथील रहिवासी असलेल्या ब्यूने पुढे सांगितले की, उंचीमुळे त्यांना नेहमी प्रवासात अडचणी येतात, मात्र यावेळी उंचीमुळे आपले तिकीट प्रथम श्रेणीत जाईल याची कल्पनाही त्याने केली नव्हती.