ठळक बातम्या

५४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

  • महाराष्ट्राचे संघ जबलपूरमध्ये दाखल

मुंबई – ५४ वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर २०२१ या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राइट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जबलपूरमध्ये दाखल झाले आहेत. सोलापूर येथे ५७ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून निवड झालेल्या महाराष्ट्राच्या पुरुष संघांचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रक्षिक्षण शिबीर राज क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर, कुळगाव, जि. ठाणे येथे किशोर पाटील यांच्या सहकार्याने पार पडले, तर महिला संघाचे शिबीर रा. फ. नाईक विद्यालयात पार पडले.
पुरुष संघाचे प्रक्षिक्षक बिपीन पाटील (मुंबई) व महिला संघ प्रक्षिक्षक महेश (मयूर) पालांडे (ठाणे) यांनी या शिबिरात खेळाडूंकडून कसून सराव करून घेतला. गतवेळी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता. छत्तीसगड येथे गेल्या वेळी (२०१९-२०) पुरुष संघाला रेल्वेकडून तर महिला संघाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पराभव पत्करावा लागला होता. यावर्षी महाराष्ट्राच्या सब जुनियर (किशोर-किशोरी) व जुनियर (कुमार-मुली) खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावताना दुहेरी मुकुट मिळवला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे पुरुष महिला संघ सुद्धा सुवर्ण पदकासह दुहेरी मुकुट मिळवताना हॅट्ट्रिक करणार का? याकडे संपूर्ण खो-खो रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धेत साखळीत महाराष्ट्राचा पुरुष संघ तेलंगणा, हरयाणा, हिमाचल प्रदेश व नागालँड या संघांबरोबर तर महिला संघ विदर्भ, मध्य भारत, अंदमान-निकोबार व नागालँड या संघांबरोबर खेळेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …