नवी दिल्ली – करचोरीच्या प्रकरणात अटक असलेला अत्तर व्यापारी पीयूष जैन याने न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे. जैन याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, करचोरी आणि दंड असा मिळून माझ्यावर ५२ कोटी रुपयांचा कर आहे. डायरेक्टरेट ऑफ जीएसटी इंटेलिजन्सने (डीजीजीआयने) जप्त केलेल्या पैशांमधून ५२ कोटी रुपयांची कपात करावी आणि बाकीचे पैसे मला परत देण्यात यावेत. पीयूष जैन याला करचोरी प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो कानपूरमधील कारागृहामध्ये आहे.
डीजीजीआयचे वकील अंबरीश टंडन यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, पीयूष जैन याच्या घरातून जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम ही करचोरीची आहे. जैन याच्या घरातून पैशांनी भरलेले ४२ बॉक्स जप्त करण्यात आले होते. १७७ कोटी ४५ लाख एवढी ही रक्कम आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. दोन टप्प्यांत ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे पीयूष जैन याने न्यायालयाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये त्याने म्हटले आहे की, आपल्यावर करचोरी प्ररणात ५२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात यावा व उर्वरीत रक्कम मला परत मिळावी.
कानपूरमधील अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या घरावर तीन दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये कोट्यवधीची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली होती, तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या, चांदीचे दागिने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याची अनेक तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. तो सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …