५० वर्षांनंतर उघडला गुहेचा दरवाजा; आतील काळी पोटली उघडताच लोक बाहेर पळाले

जगात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. कधीकधी अपेक्षाही नसलेल्या गोष्टी घडतात. अलीकडेच, मौल्यवान वस्तू सापडण्याच्या आशेने इटलीतील एका गुहेत गेलेल्या लोकांच्या हाती एक भीतीदायक गोष्ट लागली. गेल्या ५० वर्षांपासून एक प्रेत आतमध्ये बंद होते. हा मृतदेह कोणत्या परिस्थितीत सापडला याची चर्चा सुरू झाली आहे. सूट-बूट आणि टाय घातलेला हा माणूस गेल्या ५० वर्षांपासून गुहेत बसला होता.
त्या व्यक्तीला या अवस्थेत पाहून लोकांनी आरडाओरडा सुरू केला. तज्ज्ञ त्याला ‘एलिफंट मॅन’ असे नाव देत आहेत. ज्या गुहेत मृतदेह सापडला आहे, ती गुहा प्रत्यक्षात ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेली आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही गुहा बंद होती. आतील प्रेत सुकले होते. ती तपासणीसाठी घेतली होती. तपासात शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे आढळून आले. त्याच्या चेहºयावर आणि नाकावर खूप खोल जखमा होत्या.

सर्वात विचित्र गोष्ट अशी होती की, त्या माणसाने चांगले कपडे घातले होते. त्याचे वय सुमारे ५० वर्षे होते. त्या व्यक्तीने सूट-बूट आणि टाय घातला होता. याशिवाय त्याच्या पर्समधून काही नाणीही सापडली आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही व्यक्ती १९७०पासून या गुहेत बसली होती. आता ही व्यक्ती या गुहेत कशी पोहोचली याचा शोध घेतला जात आहे. मात्र, आतापर्यंत अनेक सिद्धांत समोर येत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कदाचित ही व्यक्ती स्वत: या गुहेत जाऊन बसली असावी. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. असे होऊ शकते की, एखाद्या विधी अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने चांगली तयारी केली आणि स्वत:चा बळी देण्यासाठी या गुहेत प्रवेश केला. या व्यक्तीच्या पायात ४१ आकाराचे बूटही आढळून आले, तसेच हातात घड्याळ. द सनच्या वृत्तानुसार, पोलीस आणि काही लोक बेपत्ता व्यक्तीच्या शोधात टेकडीवर शोध घेत असताना, हा मृतदेह सापडला. तसेच शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याची पुष्टी पोलिसांनी दिली. फक्त चेहºयावर दुखापत होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …