५०१ ते ७०० चौ. फुटांच्या सदनिका व गाळ्यांच्या मालमत्ता करात ६० टक्के सूट द्यावी – काँग्रेस


मुंबई – राज्य सरकारने मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. मात्र, जे निवासी आणि व्यावसायिक गाळे ६०० ते ७०० फुटांपेक्षा कमी असतील, तर त्यांच्या मालमत्ता करात ६० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौ. फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर २०२२ पासून माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व त्यांचे अभिनंदन करतो, परंतु मुंबई काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आर्थिक वर्ष २०२० ते २०२५ या कालावधीकरिता मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौ. फूटपर्यंत चटईक्षेत्र असलेल्या सदनिका व गाळ्यांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करावा आणि ५०१ ते ७०० चौ. फुटांपर्यंत चटईक्षेत्र असलेल्या सदनिका व गाळ्यांचा ६० टक्के मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी केली होती. आजही आमची तीच मागणी आहे. या मागणीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाठवलेले आहे, असे भाई जगताप यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …