प्रत्येकालाच चॉकलेट खायला आवडते. लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला चॉकलेटची गोड चव चाखताना आनंद होतो. मात्र, घरी बसून चॉकलेट खाल्ल्याने तुम्ही करोडपती झालात तर? असे कोणा बरोबरच घडले नसेल. ब्रिटनमधील एका महिलेला हा आनंद मिळाला आहे. तिने ५०० रुपयांना चॉकलेट विकत घेतले अन् त्याबदल्यात तिला इतके पैसे मिळाले की, तिला स्वत:च्या नशिबावर विश्वास बसेना.
ज्यांना चॉकलेटची गोड चव आवडते त्यांना आता ही गोड कॅडबरी खाण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले आहे. एका ब्रिटिश महिलेला सर्वांप्रमाणेच चॉकलेट आवडते आणि तिने खरेदी केलेल्या चॉकलेटची चव चाखताच तिला चॉकलेट मेड वुमन मिलियनेअरला भेटण्याची संधी मिळाली. जेव्हा महिलेला कळाले की, तिच्या ५०० रुपयांच्या चॉकलेटने तिला लाखोंचा नफा मिळवून दिला आहे, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
ब्रिटनमधील नॅनटविच येथील एका सुपरमार्केटमध्ये अशी आॅफर दिली जात होती की, तिथून चॉकलेट खरेदी करणाºयांना लॉटरी जिंकण्याची संधी मिळू शकते. तसे, अशा आॅफर बाजारात दररोज येतात, त्यामुळे त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. पण या बाईला चॉकलेट खायचे होते म्हणून तिने ते विकत घेतले. मात्र, त्या दिवशी महिलेचे नशीब या चॉकलेटमुळेच फळफळणार होते, तिच्या चॉकलेटमध्ये सोन्याचे तिकीट सापडले.
सीन वॉकर असे लॉटरी जिंकलेल्या महिलेचे नाव आहे. एक ४३ वर्षीय महिला आपल्या मुलासोबत हे चॉकलेट खरेदी करण्यासाठी आली होती. अल्दी स्टोअरमधून चॉकलेट बार खरेदी करताना, तिला ५०० रुपयांच्या बदलत्यात लाखो मिळतील याची अजिबात कल्पना नव्हती. मात्र, नंतर चॉकलेट खाताना आई-मुलाला त्यातून सोन्याचे तिकीट मिळाले. या तिकिटाची किंमत ५ हजार ब्रिटिश पौंड, म्हणजेच भारतीय चलनानुसार ५ लाख रुपये होती. मिररच्या रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेला हे तिकीट मिळाले तेव्हा तिला तिच्या नशिबावर अजिबात विश्वास बसला नाही.
हे सोनेरी तिकीट मिळालेली वॉकर ही एकमेव महिला नाही. चॉकलेट कंपनीने अशा २४ चॉकलेटच्या आत गोल्डन तिकीट लावले आहे. वॉकर व्यतिरिक्त अजून २३ जणांना हे बक्षीस मिळायचे आहे. चॉकलेट्समध्ये ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस लपवण्यात आले आहे. ज्या ग्राहकाच्या नशिबात आहे, तो जिंकून मालामाल होऊ शकतो.