४ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे ३० नवीन संक्रमित आढळले

महाराष्ट्रात सापडले ८ रुग्ण
देशात नवीन व्हेरिएंटचे एकूण १४३ प्रकरणे झाली

नवी दिल्ली – देशाच्या ४ राज्यांमध्ये शनिवारी ओमिक्रॉनची एकूण ३० नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात ८, कर्नाटकात ६, केरळमध्ये ४ आणि तेलंगणात १२ ओमिक्रॉन संक्रमित आढळले आहेत. खरेतर येथे अद्याप ३ लोकांचा रिपोर्ट पेडिंग आहे. देशात आता ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या १४३ झाली आहे.
देशात सर्वात जास्त ओमिक्रॉन संक्रमित सध्या महाराष्ट्रात (४८) आहेत. मुंबईत पुन्हा ४, साताºयात ३ आणि नागपुरात १ केस सापडल्याची पुष्टी झाली आहे, तर कर्नाटकात सापडलेले ६ संक्रमित दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या दोन मेडिकल संस्थांमध्ये सापडले आहेत.

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन ब्रिटेनमध्ये झपाट्याने पाय पसरवत आहे. येथे आतापर्यंत याचे २४,९६८ केस आढळले आहेत, तर यामुळे संक्रमित ७ लोकांचा मृत्यूही झालेला आहे. ब्रिटेनच्या आरोग्य सुरक्षा एजेंसीने शनिवारी सांगितले की, १७ डिसेंबरला २४ तासांत एकूण १० हजार नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यावरून समजते की, नवीन व्हेरिएंट किती झपाट्याने पसरत आहे. रुग्णालयात सध्या नवीन व्हेरिएंटच्या ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …