आयर्लंडमध्ये राहणाºया मित्रांच्या एका गु्रपने येथील एका पबवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या चार मित्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी पबमध्ये फक्त ४ तास घालवले. त्याऐवजी त्यांना ५० हजार रुपयांचे बिल देण्यात आले.
कोरोनामुळे जगाला बराच काळ लॉकडाऊनचा सामना करावा लागला. यानंतर हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर आता रेस्टॉरंटपासून बारपर्यंत पब सुरू झाले आहेत. आयर्लंडमध्ये राहणाºया मित्रांनीही खूप दिवसांनी भेटण्याचा बेत आखला आणि एका पबमध्ये टेबल बुक केले; पण हा अनुभव त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षणांपैकी एक ठरेल याची त्यांना पुसटशीही फारशी कल्पना नव्हती. मित्रांनी आयर्लंडमधील एका पबमध्ये चार तास घालवले. त्याबदल्यात निघताना त्यांना ५० हजारांचे बिल दिल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली.
या ग्रुपने त्यांचा हा फसवणुकीचा अनुभव ळ१्रस्रअ५्रि२ङ्म१ वर पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले की, जर कोणी या पबमध्ये जाण्याचा विचार करत असेल, तर त्यांनी त्यांचा विचार बदला. या पोस्टनंतर, इतर अनेक लोकांनीदेखील या पबचे असेच नकारात्मक अनुभव पोस्ट केले आहेत. वास्तविक, या मित्रांनी त्यांच्या भेटीसाठी पबमध्ये बुकिंग केले होते; पण तिथे पोहोचल्यावर त्याची सर्व्हिस खूपच खराब होती. यासोबतच बिलही त्यांना सुपूर्द करण्यात आले. यामध्ये त्यांनी आॅर्डर न केलेल्या वस्तूंचाही समावेश होता.
या मित्रांनी त्यांचा चार तासांचा बुकिंगचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी खूप आधी भेटण्याचा बेत आखला होता. यानंतर त्यांनी पबमध्ये बुकिंग केले. ज्या दिवशी ते भेटणार होते, त्या दिवशी कोणतीही सूचना न देता त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आले. मित्र तिथे पोहोचल्यावर त्यांना बुकिंग रद्द झाल्याची माहिती मिळाली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी त्यांना बसण्यासाठी टेबल देण्यात आले. यानंतर या मित्रांची पहिली आॅर्डरही काही तासांनंतर घेण्यात आली. सर्व्हिंग कालावधीतही बराच वेळ घेण्यात आला.
त्यांच्यानंतर आलेल्या ग्राहकांना आधी सेवा दिल्याचे मित्रांनी सांगितले. त्यांना आॅर्डरसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली, तसेच अनेकवेळा आॅर्डर देण्यास सांगितले. यानंतर त्यांनी अशा सेवांमध्ये चार तास घालवले. अखेर त्यांना बिल देण्यात आले, तेव्हा सर्वांना बिलाचा आकडा पाहून आश्चर्य वाटले. त्यांना चार तासांसाठी ५० हजार द्यावे लागले. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. मित्रांचे म्हणणे आहे की, बिलात त्या वस्तूंचाही समावेश आहे, ज्या त्यांना दिल्या गेल्या नाहीत. त्याने बिलाचा फोटोही शेअर केला आहे. अशी निकृष्ट सेवा म्हणजे फसवणूक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनाही या पबमध्ये न जाण्याची विनंती करण्यात आली आहे.