४ कान असलेली अनोखी मांजर पाहून लोक झाले थक्क

आजकाल रशियन वंशाच्या मांजरीची जोरदार चर्चा सुरू आहे. या अनोख्या मांजरीला एक नाही, दोन नाही, तर ४ कान आहेत. तिचे कान इतर मांजरांपेक्षा वेगळे असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. या ४ महिन्यांच्या मांजरीचे नाव मिडास आहे आणि तिचे स्वत:चे इंस्टाग्राम पेजदेखील आहे, ज्याला ४६ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, केवळ मांजरीचे कान आश्चर्यकारक नाहीत, तर तिच्या छातीवर एक पांढरे जन्मचिन्ह देखील आहे जे हृदयाच्या आकाराचे आहे.
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने जेव्हा सिनेजगतात प्रवेश केला, तेव्हा अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या हाताला असलेल्या एक जास्तीचे बोट पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटायचे. निसर्गाने बनवलेल्या वस्तूंमध्ये काहीतरी वेगळे असते, तेव्हा ते पाहून लोकांना नेहमीच आश्चर्य वाटते. त्यामुळेच चीनमधून आलेला दोन तोंडी साप, टू-फेस्ड टर्टल किंवा चार हातांचे मूल पाहून सगळेच दंग होतात. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ४ कान असलेली मांजर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

अनेक प्राणीप्रेमी मांजरींबद्दल वेडे आहेत, जे मांजर ज्या पद्धतीने खेळते ते पाहून त्यांच्यावर प्रेम करतात. अलीकडेच एका महिलेने मांजर दत्तक घेतले आहे, ज्यानंतर लोक सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. तुर्कस्तानमध्ये राहणारी एका महिला कॅनिस डोसेमेसी आणि तिच्या जोडीदाराने ही मांजर दत्तक घेतली आहे.
मांजरीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून असे दिसून आले आहे की, कॅनिस आधीपासूनच एक पाळीव प्राणी आहे आणि मिडासला दत्तक घेण्यापूर्वी तिच्याकडे १२ वर्षांची डॉगी सुझी होती. मिडास आणि सुझी यांचे खूप छान जमत आहेत. दोघांचे एकत्र खेळतानाचे अनेक फोटो अकाऊंटवर दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये मांजर तिच्या मैत्रिणी सुझीला गुड नाईट किस देताना दिसत आहे. मांजरीची शिक्षिका कॅनिस हिने सांगितले की, तिचे चार कान तिच्या ऐकण्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे ती इतर मांजरीप्रमाणेच सामान्यपणे प्रतिसाद देते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …