४० हजार वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा डीएनए एकच – मोहन भागवत

धर्मशाळा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयांच्या डीएनएवर भाष्य केले आहे. मागील ४० हजार वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा डीएनए आजच्या काळातील लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला, आपली संस्कृती टिकून राहिली, असे वक्तव्य भागवत यांनी केले आहे. भागवत पाच दिवसांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत.

ते पुढे म्हणाले की, अनेकदा माध्यमांमध्ये संघाला सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून दाखवले जाते, पण हे अजिबात खरे नाही. माध्यमे आम्हाला सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून संबोधतात, परंतु हे असत्य आहे, मात्र आमचे काही कार्यकर्ते नक्कीच सरकारचा भाग आहेत. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतेही आश्वासन देत नाही. भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला. कारण लोक एकजूट नव्हते असे सांगत त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विधान उद्धृत करत म्हणाले की, आपण कोणत्याही शक्तीमुळे पराभूत होत नाही, तर आपल्यातीलच कमकुवतपणामुळे पराभूत होत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमावेळी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर १४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला आहे. कारण लोक एकजूट नव्हते, असे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार भागवत हे पाच दिवसांच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते तिबेटी धर्म गुरू दलाई लामांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …