३६५ दिवस शिवजयंती साजरी करावी – राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे, तर वर्षाचे ३६५ दिवस साजरी करावी, असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. चांदिवली येथे मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आज व्यासपीठावर भाषणासाठी नाही, तर तुमचे दर्शन व्हावे यासाठी आलो आहे, अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली.
आज शिवजयंती आहे. मनसे पक्ष शिवजयंती तिथीने साजरी करतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे जेवढे सण येतात, दिवाळी येते, गणपती येतात ते तिथीने येतात. गणपती गेल्यावर्षी कोणत्या तारखेला आले ते यावर्षीही त्याच तारखेला येतील असे नाही, कारण ते तिथीने येतात.
०००००००००००००००००००००००००००
स्टेज कोसळले
गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळण्याची घटना घडली. राज ठाकरे यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नसून, ते सुखरूप आहेत. शनिवारी शिवजयंती आणि शाखेचे उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. त्यादरम्यान कार्यक्रम सुरू असताना अचानक स्टेज कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. स्टेजवर गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे. गोरेगावमध्ये शनिवारी मनसेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याचदरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हे स्टेज अचानक खाली कोसळले. त्यात राज ठाकरे देखील खाली पडले. या दुर्घटनेदरम्यान पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली असून, स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला आहे. मात्र राज ठाकरे सुखरूप असून, ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …