३२५ ग्रॅम वजनाची मुलगी पाहून डॉक्टरही झाले थक्क

ब्रिटनमध्ये जन्मलेल्या ३२५ ग्रॅम वजनाच्या हॅना या मुलीला डॉक्टर फायटर म्हणून संबोधत आहेत, तिच्यासाठी जगणे अशक्य वाटत होते. आई-वडील ती घरी येण्याची वाट पाहत आहेत. मुलीनेही करिष्मा केला. तिचे वजन वाढत आहे. आशा आहे की, ती लवकरच सुरक्षित स्थितीत पोहोचेल.
ब्रिटनमध्ये जन्मलेली टिनी हॅना ही यूकेच्या २० वर्षांच्या इतिहासात जिवंत राहिलेली सर्वात कमी वजनाची मुलगी आहे. टीनी हॅनाचे वजन फक्त ३२५ ग्रॅम आहे. तिची जगण्याची शक्यता २० टक्क्यांपेक्षा कमी होती, परंतु मुलीने करिष्मा केला. त्याचे कारण म्हणजे तिने स्वत:हून श्वास घेण्याचा प्रयत्न केला. ती जीवनाशी संघर्ष करत आहे. २५व्या आठवड्यात हॅनाच्या जन्मामुळे तिचा पूर्ण विकास होऊ शकला नाही. आता तिला वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हॅनाची आई एली पॅटन स्वत: फक्त १७ वर्षांची आहे. आपल्या मुलीला या अवस्थेत पाहणे तिच्यासाठी सोपे नाही. हॅना आता इनक्युबेटरमध्ये आहे. ती इतकी अशक्त आहे की, तिला थंडीपासून वाचवण्यासाठी ब्लँकेटऐवजी बबलरॅप गुंडाळण्यात आले आहेत, कारण ते ब्लँकेटच्या तुलनेत खूप हलके आहे.
एली आणि तिचा जोडीदार ब्रँडन स्टिबल्स यांना डॉक्टरांनी नियमित स्कॅनिंगदरम्यान मुलीच्या कमी वाढीबद्दल चेतावणी दिली होती. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या २२ व्या आठवड्यातही, बेबी हॅनाची वाढ १६ आठवड्यांच्या मुलाइतकीच होती. ज्याबद्दल डॉक्टरने चिंता व्यक्त केली होती. काही आठवड्यांनंतर, २५ व्या आठवड्यात, एलीने हॅनाला जन्म दिला. ही तातडीची शस्त्रक्रिया होती जी प्रसूतीसाठी करावी लागणार होती. २९ डिसेंबर, २०२१ रोजी एलीची तब्येत अचानक बिघडली. ओटीपोटात आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना आयरशायरच्या क्रॉसहाऊस हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, परंतु आराम न मिळाल्याने त्यांना तात्काळ ग्लासगो येथील क्वीन एलिझाबेथ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच बेबी हॅनाचा जन्म झाला.

एली पॅटनच्या म्हणण्यानुसार, रुटीन चेकअपदरम्यान तिचा रक्तदाब वाढला होता. काही सौम्य उपचारांनंतर, रक्तदाब २ दिवसांत सामान्य झाला. जेव्हा असे वाटले की, सर्व काही चांगले झाले आहे. त्यानंतर घरी पोहोचल्यावर अचानक वेदना वाढल्या आणि शस्त्रक्रिया करावी लागली. हॅनाच्या आधी, २००३ मध्ये यूकेमध्ये जन्मलेल्या सर्वात लहान मुलाचे नाव आलिया हार्ट होते, हॅनाचे वजन ५०० ग्रॅम झाल्यानंतर, तिला क्रॉसहाऊस हॉस्पिटलमध्ये पाठवले जाईल. आशा आहे की, हॅना लवकरच तिच्या पालकांसह घरी जाऊ शकेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …