२८ फेब्रुवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई – राज्याचे पुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या वर्षात २८ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. सोमवारी अशा प्रकारची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. सोमवारी विधिमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आले होते. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान सोमवारी जाहीर करण्यात आले. याआधी सुरू असलेले हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवाससुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल, तर पुढील अधिवेशन मुंबईऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …