ठळक बातम्या

२६/११चा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही – विराट कोहली

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईसाठी २६ नोव्हेंबर २००८ हा काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत त्यादिवशी अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. तर, कित्येक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याला शुक्रवारी १३ वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या दिवशी या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ‘कू’च्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही, या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांनाही कधीच विसरता येणार नाही. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना आणि कुटुंबातील सदस्याला गमावले आहे, मी त्यांच्या दुख:त सहभागी आहे, असे विराटने म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …