२४ तासांत देशात २८,९१८ संक्रमित आढळले

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोना संसर्गाचे २८,९१८ नवीन रुग्ण आढळले, ८२.२९ हजार रुग्ण बरे झाले, तर ५१३ लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत होती; मात्र त्यात वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे १,५०० अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना संसर्गामुळे जीव गमावणाºयांची संख्याही दोन दिवसांनंतर वाढली आहे. रविवारी आणि सोमवारी कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या ३५०च्या जवळपास होती, जी बुधवारी ५००हून अधिक झाली; मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बरे झालेल्यांची संख्याही वाढली आहे. सोमवारी ८२,८१७ लोकांनी या आजारावर मात केली होती, तर मंगळवारी ८२,९१६ लोक बरे झाले.
सध्या देशात ३.६१ लाख लोक कोरोनावर उपचार घेत आहेत. तिसºया लाटेनंतर प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारांवर आली आहे. यापूर्वी ५ जानेवारी रोजी २.८५ लाख लोकांवर उपचार सुरू होते. २३ जानेवारी रोजी तिसºया लाटेत सर्वाधिक २२.४९ लाख सक्रिय प्रकरणे होती.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …