नवी दिल्ली – २० यूट्यूब चॅनेल्स आणि दोन संके तस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी माहिती त्याचप्रमाणे खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने २० यूट्यूब चॅनेल्स आणि दोन संकेत स्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. गुप्तचर यंत्रणेसोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संयुक्तपणे याबाबत आधी आढावा घेऊन अखेर ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ज्या २० यूट्यूब चॅनेल्स आणि दोन संकेतस्थळांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांनी राष्ट्रविरोधी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांनी खोट्या बातम्या प्रसारित करून राष्ट्रविरोधी काम केल्याने त्यांना ब्लॉक करण्यात येत असल्याचे सांगितले गेले आहे. गेल्या सोमवारी याबाबतच्या कारवाईचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानातून या यूट्यूब चॅनेल्स आणि संकेतस्थळाचे काम चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. भारताविरोधात काम करणाऱ्या या चॅनेल्सवरील कारवाईनंतर आता राष्ट्रविरोधी कंटेट तयार करणाऱ्यांनाही दणका बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काश्मीर, सैन्य, अल्पसंख्याक, राम मंदिर, सीडीएस बिपीन रावत यांसारख्या संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात होती, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याच यूट्यूब चॅनेल्सवर शेतकरी आंदोलन, सीएए आंदोलन आणि अल्पसंख्याकांना भडकवण्याचेही काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकशाहीविरोधी काम करणाऱ्या या यूट्यूब चॅनेल्सद्वारे आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही चुकीची माहिती प्रसारित केली जाऊ शकते, अशी भीती केंद्राने व्यक्त केली आहे. दरम्यान यूट्यूबवर असलेल्या आणि खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांची एक यादीही जारी करण्यात आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …