सध्या बॉक्सर अमांडा सेरानो आणि मिरियम गुटेरेझ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमांडाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत चेहºयावर २३६ ठोसे मारले. यानंतर मिरियमचा चेहरा ओळखताही येत नव्हता.
बॉक्सर्सचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. चॅम्पियनशीपमध्ये कधी त्यांच्या चेहºयाला दुखापत होते, तर कधी शरीराच्या इतर भागांवर. कधीकधी त्यांना ओळखणे कठीण होते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, यात सहभागी असलेल्या दोघांनाही माहीत आहे की हा फक्त एक खेळ आहे, ज्यामध्ये दुखापत होणे सामान्य आहे. नुकताच दोन बॉक्सर्सचा फोटो व्हायरल झाला होता. एक पोर्तो रिकोच्या कॅरिबियन बेटाची अमांडा आणि दुसरी स्पेनची मिरियम.
दोन बॉक्सर्समधील हा सामना खूपच कठीण होता. महिला बॉक्सर्सची प्रमुख केटी टेलर विरुद्ध तिची जागा निश्चित करण्यासाठी हा सामना सुरू होता. या सामन्याला इतिहासातील सर्वात मोठी लढत म्हटले जात आहे. केटी टेलरविरुद्ध खेळणे ही मोठी गोष्ट आहे. या सामन्यात आपले स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना खेळवला जात होता. यामध्ये अमांडाने आपल्या स्पॅनिश प्रतिस्पर्ध्याचा प्रत्येक फेरीत पराभव केला.
बॉक्सर अमांडाने पहिल्या फेरीत समोरच्या बॉक्सरला सरळ ३७ फटके दिले. संपूर्ण सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर अमांडाने २० मिनिटांत मिरियमच्या तोंडावर एकूण २३६ पंच मारले. यानंतर जेव्हा सर्वांनी मिरियमचा चेहरा पाहिला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मिरियमचा चेहरा ओळखता येत नव्हता. तिचा संपूर्ण चेहरा सुजला होता. तिच्या प्रतिस्पर्ध्याला अनेक ठोसे मारल्यानंतर अमांडा म्हणाली की, ती मिरियमच्या धैर्याची प्रशंसा करते.
अमांडा पुढे म्हणाली की, मिरियम ही उत्तम खेळाडू आहे. ती सध्या तिच्या सर्वोत्तम स्थितीत आहे आणि आणखी अनेक सामन्यांमध्ये चमत्कार दाखवेल. पराभवानंतर मिरियमनेही स्पोर्ट्समन स्पिरिटचा परिचय करून दिला आणि अमांडासोबत हसत-हसत फोटो काढला. त्याचवेळी मिरियमने या सामन्यानंतर सांगितले की, ती शेवटपर्यंत लढली, हीच मोठी गोष्ट आहे. ती हरली पण अभिमानाने.
2 comments
Pingback: seo plan for ecommerce website
Pingback: รื้อถอน