ठळक बातम्या

२०२४ मध्येही मोदीच; लावा जोर – देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

मुंबई – वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले. आता २०२४ मध्येही केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सरकार येईल. त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी आपली ताकद पणाला लावावी असेआव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न २०१९ मध्येही झाले, मात्र लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही २०२४ मध्ये असेच होणार असून पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ममतादीदींनी मुंबईत येऊन काही भेटीगाठी घेतल्या. या सर्वघडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्णझाल्यावर आमच्याशी काय लढायचेतेठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला. गोवा, ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नाहीतर आम्ही मुख्यच विरोधी पक्ष आहोत असेदाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, २०२४ देखील मोदींचेच असेल, अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी यांनी सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचे बेगडी सावरकर प्रेम समोर आलं असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपला विजयी होण्याचा स्ट्राइक रेट पाहावा आणि महाराष्ट्रातून जनतेने कोणाला पळवून लावले हे निवडणुकीत दिसले. आता पुढील निवडणुकीतही दिसून येईल असेही फडणवीस यांनी म्हटले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …