२०२२ च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट निश्चित – तज्ज्ञ

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभराची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतातही १५ दिवसांत ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रीय कोविड-१९ सुपरमॉडेल समितीने म्हटले आहे की, देशात दररोज सुमारे ७५०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र ओमिक्रॉनमुळे हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी ती दुसºया लाटेपेक्षा कमी प्रभावी ठरेल. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षी लवकर येण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, पूर्वीपासून सुरू असलेल्या लसीकरणामुळे ते तितकेसे प्रभावी होणार नाही, पण तिसरी लाट नक्कीच येईल. सध्या कोरोनाचे दैनंदिन रुग्ण ७५०० च्या आसपास आहेत, पण जसजसे डेल्टाची जागा घेऊ लागेल तसतसा हा आकडा झपाट्याने वाढेल. आयआयटी हैदराबाद येथील प्रोफेसर विद्यासागर यांनी सांगितले की, दुसºया लाटेच्या तुलनेत तिसºया लाटेत दैनंदिन प्रकरणे कमी असतील.
विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, जर देशात तिसरी लाट आल्यास खूप वाईट स्थिती उद्भवल्यास दररोज २ लाखांहून अधिक केसेस होणार नाहीत. ते म्हणाले की, मी यावर जोर देतो की हे अंदाज आहेत, भविष्यवाणी नाही. आमच्या सिम्युलेशनच्या आधारे, सर्वात वाईट परिस्थितीत दैनंदिन प्रकरणांची संख्या दररोज १.७ ते १.८ लाखांपेक्षा कमी असेल. दुसºया लाटेच्या दैनंदिन प्रकरणांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.
समितीचे आणखी एक सदस्य, मनिंदा अग्रवाल यांनी सांगितले की, जर आपण दक्षिण आफ्रिका आणि विशेषत: गौतेंग प्रांताकडे पाहिले, जेथे ओमिक्रॉनची प्रथम ओळख झाली होती,तर आपल्याला प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसते. मात्र सुरुवातीला रुग्णालयात भरतीची परिस्थिती आली नाही. आता ती परिस्थिती सुरू होत आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …