ठळक बातम्या

२०२१ मधील प्रयोगशील कलाकार


गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे लोकांवर सक्तीने घरात बसण्याची वेळ आली. त्यावेळी लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांमुळे चित्रपटगृहेही बंद होती. परिणामी लोकांना मनोरंजनासाठी ओटीटी माध्यमावर अवलंबून रहावे लागले, परंतु ओटीटीनेही एकापेक्षा एक सरस कंटेंट सादर करून आपला असा काही प्रभाव लोकांवर टाकला की, आता लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घरातील सोफ्यावर आरामात बसून चहाचे घोट घेत चित्रपट पहायला जास्त आवडू लागले आहे. लोकांची बदललेली आवड कलाकारांच्याही लक्षात आली आणि त्यांनीही आपल्या अभिनयातील तोचतोचपणा टाळून व्यक्तिरेखांमध्ये काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि त्यांचे हे प्रयोग यशस्वीही ठरले, तर पाहूयात अशाच काही कलाकारांची झलक ज्यांच्या चित्रपटांच्या परिणामांपेक्षा प्रेक्षकांची नजर त्यांच्या व्यक्तिरेखा आणि अभिनयावर खिळून राहिली.

फातिमा सना शेख (अजीब दास्तां) – बहुमुखी अभिनेत्री बनण्याच्या प्रयत्नात असलेली सीझनमधील सर्वात चर्चित अभिनेत्री फातिमा सना शेख २०२१च्या प्रयोगशील कलाकारांच्या
यादीत स्थान पटकावण्यात यशस्वी ठरली. अजीब दास्तांमधील तिच्या अभिनयाचे तिच्या सह कलाकारांनी भरभरून कौतुक केले. आमिर खानच्या अभिनयाचा तिच्या या व्यक्तिरेखेच्या

चरित्र चित्रणावर खास प्रभाव दिसून येत आहे.
नुसरत भरूचा (छोरी) – अभिनेत्री नुसरत भरूचाने छोरी या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरमधील सर्वात मोठी रिस्क घेतली होती. खरेतर हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ शकला

नाही आणि मेकिंगच्या तुलनेतही ही थोडा कमी वेग असलेला चित्रपट आहे, परंतु यातील नुसरतच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. आपल्या खांद्यावर हा चित्रपट उचलून धरण्याच्या
नुसरतच्या प्रयत्नांचे लोकांनी कौतुक केले आहे.

विद्या बालन (शेरनी) – गेल्यावर्षी थेट ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणजे शकुंतलादेवी. हा चित्रपट दुसºया क्रमांकावर होता, तर यावर्षी
विद्याने शेरनीमध्ये आपल्या मागील चित्रपटाप्रमाणे व्यक्तिरेखेबरोबर प्रयोग करत एक शानदार परफॉर्मन्स सादर केले. एका वनअधिकाºयाच्या रूपात विद्याने आपल्या अभिनयाचे वेगळेच

रंग सादर केले.
अभिषेक बॅनर्जी (रश्मी रॉकेट) – ओटीटीवर रिलीज झालेल्या दास्तान आणि कहानियाँ दरम्यान ज्या फिल्मद्वारे अभिषेक बॅनर्जीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली तो म्हणजे तापसी पन्नू

स्टारर रश्मी रॉकेट हा चित्रपट! अभिषेकने या चित्रपटात एका अशा वकिलाची भूमिका साकारली आहे जो तापसी पन्नूवरील पुरुष असण्याचा आरोप कोर्टात चुकीचा सिद्ध
करून दाखवतो. खरेतर चित्रपटाचा मध्यांतरानंतरचा भाग हा पूर्णत: अभिषेकवरच होता आणि अभिषेकने आपली ही भूमिका तितक्याच उत्कृष्टपणे साकारलीही आहे.

पंकज त्रिपाठी(मिमी) – अनेक वर्षांनंतर लोकांना पंकज त्रिपाठी हे एखाद्या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसून आल्याने ते खूप खुश झाले. या चित्रपटातील त्यांची आणि क्रिती सेननची
केमिस्ट्रीही लाजवाब ठरली. सध्या ते ८३ या चित्रपटात मानसिंगच्या व्यक्तिरेखेत देखील खूप उठून दिसत आहेत.

विक्की कौशल (सरदार उधम) – विक्की कौशलला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा हाऊ इज द जोशचा नारा लावताना पाहण्यासाठी त्याचे चाहते संपूर्ण वर्षभर वाट पाहत होते आणि
विक्कीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला सरदार उधममध्ये! हा चित्रपट भारताच्या वतीने आॅस्कर पुरस्कारासाठी पाठवण्याची अपेक्षा त्याच्या चाहत्यांची होती, परंतु फिल्म

फेडरेशन आॅफ इंडियाला हा चित्रपट आॅस्करसाठी पाठवण्याच्या योग्यतेचा वाटला नाही.
क्रिती सेनन (मिमी) – थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये नंबर वन ठरलेल्या मिमी चित्रपटातून क्रिती सेननने स्वत:ला प्रयोगशील अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. क्रितीने यात

एका अशा तरुणीची भूमिका साकारली आहे, जिला एक विदेशी जोडपे आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी सरोगेसी मदर बनवते. या चित्रपटातील क्रितीचा अभिनय म्हणजे मैलाचा दगड
ठरला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: visit website