धक्कादायक आकडेवारी समोर
नवी दिल्ली – दुष्काळ, ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, बेरोजगार, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, मुलीचे लग्न अशा विविध कारणांतून देशात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. प्रशासनाचा नाकर्तेपणा हा शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील सर्वात मोठे कारण आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०२० मध्ये देशात एकूण ५५७९ शेतकऱ्यांनी विविध कारणांतून मृत्यूला कवटाळले, अशी माहिती केंद्रीय कृ षीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. २०१९ च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाली असली, तरी हा आकडा लहान नाही.
२०१९ मध्ये देशात ५९५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत तोमर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिले नाही. पण कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर, व्यसन, प्रेम प्रकरणे, विवाहासंबंधित मुद्दे, बेरोजगारी, व्यावसायिक समस्या, परीक्षेतील अपयश, संपत्तीचा वाद अशा विविध कारणांतून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग शेतकऱ्यांसाठी ‘सुसाइड झोन’, म्हणूनच ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांत या भागातील अनेक शेतकरी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आणि ओल्या दुष्काळाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या विभागातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
२०२० मध्ये महाराष्ट्रात एकूण २५६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा देशातील एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या तुलनेत तब्बल ४३ टक्के इतका आहे. म्हणजेच देशातील आत्महत्या करणारे जवळपास निम्मे शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यापाठोपाठ, कर्नाटक (१०७२), आंध्र प्रदेश (५६४), तेलंगणा (४६६), मध्य प्रदेश (२३५) आणि चंदीगडमध्ये २२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर उत्तर प्रदेशात २०२०मध्ये ८७ शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. त्यानंतर, तामिळनाडू (७९), केरळ (५७), आसाम (१२), हिमाचल प्रदेशमध्ये ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या व्यतिरिक्त मेघालय आणि मिझोराम या ईशान्येकडील राज्यांत प्रत्येकी चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …