२०२०मध्ये क्षयरोगाने सर्वाधिक मृत्यू

२०२०मध्ये क्षयरोगाने सर्वाधिक मृत्यू

कोरोना महामारीच्या काळात उपचाराकडे झाले दुर्लक्ष
जगात १५ लाख, तर भारतात ५ लाख बळी

न्यूयॉर्क – जागतिक आरोग्य संघटनेने आपला क्षयरोग संदर्भातील वार्षिक अहवाल जाहीर केला असून, त्यातील काही निष्कर्ष धक्कादायक आहेत. गेल्या दहा वर्षांत प्रथमच २०२०मध्ये क्षयरोगाने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीच्या काळात उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे आरोग्य संघटनेच्या या अहवालात म्हटले आहे.
२०२० या एका वर्षात क्षयरोगाने १५ लाख लोकांचा बळी गेला असून, त्यापैकी ५ लाख लोकांचा बळी एकट्या भारतात गेला आहे. २०१९ या वर्षाच्या तुलनेत क्षयरोगाने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण या कालावधीत पसरलेल्या कोरोना महामारीमुळे क्षयरोगाच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाले. सध्या जगभरात १ कोटीपेक्षा जास्त लोक क्षयरोगाने त्रस्त असून, त्यापैकी ११ लाख लहान मुले आहेत. सर्वात जास्त रुग्ण भारत, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान या देशांमध्ये आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

पण हे उद्दिष्ट फक्त ९ टक्केच पूर्ण झाले. महामारीच्या काळात क्षयरोगाने मरण पावलेल्यांचे प्रमाण वाढत असले, तरी क्षयरोगाने बाधित होणाºयांची संख्या मात्र कमी झाली आहे. २०१९ आणि २०२० या कालावधीमध्ये क्षयरोगाने बाधित होणाºयांचे प्रमाण तब्बल चाळीस टक्‍क्‍यांनी घटले आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *