बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार हा सध्या एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देताना दिसून येतोय, ज्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला घेऊन चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
सध्याच्या घडीला अक्षय प्रत्येक बड्या निर्माता-दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. आताही अक्षयने एक नवा चित्रपट साइन केला असून, त्याकरिता त्याने थोडे ना थोडके तब्बल १५० कोटी चार्ज केले आहेत. त्यामुळे तो बॉलीवूडचा सर्वात महागडा हिरो ठरला आहे.
केआरकेने एका ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, अक्षय कुमारने वासु भगनानी यांच्या बॅनरखाली तयार होत असलेला एक मेगा बजेट चित्रपट साइन केला आहे. हा चित्रपट अली
अब्बास जफर बनवणार आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने १५० कोटी इतके मानधन आकारले आहे. बॉलीवूडचा कोणताच अभिनेता इतकी मोठी रक्कम चार्ज करत नाही.
अक्कीने तर मानधनाच्या बाबतीत खान बंधूंनाही मागे टाकले आहे. सलमान खान आणि आमिर खानसारखे अभिनेता एका चित्रपटासाठी ५० ते ८० कोटी रुपये चार्ज करतात, मात्र
अक्षयने थेट १५० कोटी रुपये चार्ज करून सर्व अभिनेत्यांची झोपच उडवून टाकली आहे. तसेचही अक्की हा बॉलीवूडचा सर्वाधिक बिझी अॅक्टर आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक
बडे चित्रपट आहेत, जे चित्रपटगृह आणि ओटीटीवर धमाल करण्यासाठी सज्ज आहेत.