जेव्हा-जेव्हा बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा प्रश्न येतो, तेव्हा आपण महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे उदाहरण देतो. बुद्धिमत्तेच्या बाबतीत या शास्त्रज्ञालाही कुणी मागे सोडले, तर त्याच्या बुद्धीपुढे मान झुकवावी लागेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका १२ वर्षांच्या ब्रिटिश मुलाने हे केले आहे. आपल्या स्मार्टनेसची पातळी आइनस्टाइनपेक्षाही वरची आहे, हे त्याने सिद्ध केले आहे.
हा काही विनोद नाही. आयक्यू टेस्टबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुम्हाला माहिती असेल की, या चाचणीद्वारे व्यक्तीची बुद्धिमत्ता, विवेक आणि तर्कशक्ती तपासली जाते. या परीक्षेत बानार्बी स्विनबर्न या १२ वर्षांच्या मुलाने महान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांना मागे टाकत हाय आयक्यू सोसायटी मेन्सा (मेनसा)चे सदस्य बनवले आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडमच्या ब्रिस्टलमध्ये राहणाºया बानार्बी स्विनबर्नने आयक्यू टेस्टमध्ये १६२ गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्याने १८ वर्षांखालील वयोगटात ही चकित करणारी कामगिरी केली आहे. असे मानले जाते की, महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनचा बुद्ध्यांक पातळी १६० होती, परंतु या मुलाची पातळी त्यापेक्षा २ गुणांनी जास्त आहे. १८ वर्षांखालील श्रेणीतील हा सर्वोच्च गुण आहे. बानार्बीला गणित आणि रसायनशास्त्राचा अभ्यास करायला आवडतं. त्याला व्यवसायातही रस आहे आणि तो खूप महत्त्वाकांक्षी आहे. भविष्यात, बनार्बीला प्रोग्रामर बनायचे आहे. आयक्यू हा जर्मन शब्द इन्टेलिजेन्स-क्वोशेन्टचा एक छोटा प्रकार आहे. आयक्यू स्कोअर तुमची विचार करण्याची क्षमता आणि ज्ञानाची पातळी सांगते. आपला मेंदू एखादे काम किती चांगले करतो, आपण एखाद्या समस्येवर किती लवकर आणि चांगले उपाय शोधू शकतो, आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर किती जलद आणि अचूकपणे देऊ शकतो. आजकाल अनेक वेबसाइट्सवर आयक्यू चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही ५ मिनिटांत तुमचा आयक्यू काढू शकता. तथापि, तज्ज्ञ नेहमी त्याचे परिणाम योग्य मानत नाहीत आणि मानसोपचार तज्ज्ञांची चाचणी योग्य परिणाम देते.