ठळक बातम्या

११ मुलांची नावे ठेवली फक्त ४ अक्षरे वापरून

मुलांच्या जन्माबरोबरच पालक त्यांच्या नावांबाबत विचार मंथन करू लागतात. अशा परिस्थितीत, जर आम्ही तुम्हाला अशा जोडप्याबद्दल सांगितले, ज्यांच्या घरात ११ मुलांचे नाव ठेवण्यासाठी फक्त४ अक्षरे वापरली गेली आहेत, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे कुटुंब बेल्जियममध्ये राहते आणि त्याच्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे.
ग्वेनी ब्लँकार्ट आणि मारिनो वॅनिनो यांना एकूण ११ मुले आहेत. यापैकी ७ मुली आणि ४ मुले आहेत. त्यांच्या सर्व मुलांची नावे इंग्रजी वर्णमालेत फक्त ४ अक्षरांनी बनलेली आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन मुलांचे नाव ठेवले – अ‍ॅलेक्स आणि एक्सेल. तेव्हाच त्यांना कल्पना आली की, ते उर्वरित मुलांची नावेही ए, ई, एल आणि एक्स हे अक्षरे घेऊनच ठेवतील.

पहिल्या दोन मुलांनंतर ग्वेनी ब्लँकार्ट आणि मारिनो वॅनिनो यांनी या चार अक्षरांमधील सर्व मुलांची नावे हळूहळू बदलली. त्यांच्या ११ मुलांची नावे आहेत अनुक्रमे अलेक्स, एक्सेल, झेला, लेक्सा, झेल, एक्सील, एक्स्ला, लीक्स, झेल, एलेक्स आणि अलेक्स. त्यांची ५ मुले एकाच शाळेत शिकतात, जिथे शिक्षकांसाठीही ही एक वेगळी बाब आहे, जिथे सर्व भावंडांची नावे फक्त ४ अक्षरांभोवती फिरतात. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये हे अनोखे जोडपं आपलं १२वं अपत्य या जगात आणणार आहे. त्यासाठी त्यांनी नावाचाही विचार केला आहे.
जेव्हा ग्वेनी ब्लँकार्ट आणि मारिनो वॅनिनो यांनी इंग्रजी वर्णमालेतील २२ अक्षरे वगळता फक्त ४ वर्णाक्षरे निवडले, तेव्हा त्यांना असे वाटले नाही की, ते इतके अनोखे काही करणार आहेत; मात्र मुलांची संख्या वाढल्याने त्यांनी केवळ ४ अक्षरे ए, ई, एल आणि एक्स वापरून ९ मुलांची नावे ठेवल्याने त्यांना मथळे मिळू लागले. ४ अक्षरे एकत्र करून एकूण २४ भिन्नता तयार करता येतात. यापैकी ११ वापरल्यानंतर, जोडप्याकडे आता आणखी १३ भिन्नता आहेत, जेणेकरून ते त्यांच्या पुढील मुलाचे नाव ठेवू शकतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …