१० मार्चनंतर सरकारमध्ये मोठा बदल होणार – नाना पटोले

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारमध्ये बदल होणार आहेत, असे सांगत राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल होतील, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले यांनी भंडारा येथे एका जाहीर सभा कार्यक्रमात राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर १० मार्चनंतर बदल होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ही वेळ दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १० मार्चनंतर नक्की काय बदल होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. सध्या राज्यात जे काही सगळे सुरू आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार याचे संकेत त्यांनी दिलेत. येत्या १० मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास १३ पालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळात बदल होणार का, याची उत्सुकता आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …