लिव्हरपूलमध्ये राहणाºया ५३ वर्षीय इयान विलेमनची ३७ वर्षीय पत्नी २०१६मध्ये गंभीर आजाराने मरण पावली. तेव्हापासून, त्याने आपले जीवन पूर्णपणे आपल्या पाळीव कोळ्यांसाठी समर्पित केले. अगदी लहानपणापासूनच इयानला कोळी पाळण्याची आवड होती. यामुळे तो त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या मुलालाही कोळी आवडतात. इयानने सांगितले की, त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, कोळ्यांनी त्याला दु:खातून बाहेर येण्यास मदत केली आहे.
मानव आणि प्राणी यांचे नाते खूप खास आहे. एकीकडे जिथे प्राणी माणसावर कुठलीही धूर्तता न ठेवता प्रेम करतात, तिथे माणसाचं प्रेम प्राण्यांइतकं असू शकत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला इंग्लंडमधील एका माणसाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे प्राण्यांवर विशेषत: कोळ्यांवर इतके प्रेम आहे की, त्याने आपल्या घरात १ हजार कोळी पाळले आहेत, परंतु त्यामागे एक खास कारण आहे.
लिव्हरपूलमध्ये राहणाºया ५३ वर्षीय इयान विलेमनची ३७ वर्षीय पत्नी २०१६मध्ये गंभीर आजाराने मरण पावली. इन्फ्लुएंझा व्हायरस आणि स्कार्लेट फिव्हरमुळे तिला सेप्सिस झाला, ज्यामुळे ती मृत्यूच्या उंबरठ्यावर आली. या प्रसंगी इयानला त्याच्या आयुष्यातील सर्वात दु:खद निर्णय घ्यावा लागला. त्याला आपल्या पत्नीचा लाइफ सपोर्ट संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला, त्यानंतर तो पूर्णपणे तुटला.
पत्नीच्या मृत्यूनंतर तो आणि त्याचा ८ वर्षांचा मुलगा बिली एकटेच होते. मग इयानचे लक्ष त्याच्या कोळ्यांकडे गेले. वास्तविक, इयानला लहानपणापासूनच कोळी पाळण्याची आवड होती. घरातील अनेक कोळी तो पेटीत ठेवत असे. सुरुवातीच्या काळात तो आणि मिशेल, जी पेशाने शिक्षिका होती, शिकवणीचा कोर्स करत होते, तेव्हा दोघांची भेट झाली. मग त्याने मिशेलला त्याच्या स्पायडरच्या छंदाबद्दल सांगितले. मग मिशेल प्रभावित झाली. पत्नीच्या मृत्यूनंतर इयानने सांगितले की, कोळ्यांनी दोघांनाही या दु:खातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली.
मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बिलीला कोळी देखील खूप आवडतात. त्याने १००० पैकी ८० कोळी आपल्या पॉकेटमनीने खरेदी केल्या. इयानने सांगितले की, पत्नीचा मृत्यू झाल्याने तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला कोळ्यांची काळजीही घेता आली नाही. त्यावेळी त्याने एके दिवशी कोळ्यांच्या खोलीत पाहिले असता, दोन जण मेले होते. तेव्हा त्यांना पाणी दिले नसल्याचे लक्षात आले, तेव्हापासून त्याने आपले पूर्ण लक्ष त्यांच्यावर ठेवले आहे. इयान म्हणाला की, जेव्हा तुमच्यावर एक हजार कोळ्यांची जबाबदारी असते, तेव्हा तुम्हाला स्वत:ची काळजी घेणे आणि त्यांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आता ते कोळी त्याचे जीवन आहेत आणि त्यांना वाढवताना इयानला असे वाटते की, तो मिशेलसोबत आहे.