मुंबई: मुंबई पोलीस विभागातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर हृदय शस्त्रक्रिया केली गेली असून त्याने आपल्याला पुन्हा तुरुंगात न पाठविता घरात हाउस अरेस्ट मध्ये ठेवावे यासाठी स्थानिक न्यायालयात केलेली याचिका न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी फेटाळली. त्यामुळे सचिन वाझे याला पुन्हा तळोजा येथील तुरुंगात नेले जाणार आहे. देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे मुख्य आरोपी आहे. त्याला काही दिवसांपासून हृदय आजार होता आणि त्यासाठी त्याच्यावर बायपास सर्जरी केली गेली आहे. त्यानंतर वाझे याच्या वतीने त्याच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयात अर्ज करून वाझे याला घरात राहू देण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. मात्र एनआयने त्याला विरोध करताना वाझे याला घरात राहू दिले तर तो पळून जाण्याची शक्यता असल्याचे न्यायालयात प्रतिपादन केले. त्यावर न्यायाधीशांनी वरील निर्णय दिला आहे. वाझे याला तळोजा तुरुंगात घरचे जेवण देण्याची तसेच डॉक्टर सल्ला आवश्यक असेल तेव्हा जे जे रुग्णालयात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …