हॉकी : भारताने जपानला लोळवले

ढाका – गत विजेत्या भारताने रविवारी येथे आशियाई अजिंक्यपद चषक (एसीटी) पुरुष हॉकी टुर्नामेंटच्या राऊंड रॉबिन सामन्यामध्ये जपानला ६-० ने लोळवले. या कामगिरीमुळे भारतीय टीमला राऊंड रॉबिन टप्प्यातील एकाही सामन्यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले नाही. हरमनप्रीत सिंगने दोन गोल (१० व्या आणि ५३ व्या मिनिटाला) केले तर दिलप्रीत सिंग (२३ व्या मिनिटाला), मनप्रीत सिंग (३४ व्या मिनिटाला), सुमित (४६ व्या मिनिटाला) आणि समशेर सिंग (५४ व्या मिनिटाला) यांनीही गोल करून येथील मौलाना भसानी हॉकी स्टेडियममधील या चित्तथरारक स्पर्धेमध्ये गुणफलकावर आपल्या नावांची नोंद केली. भारताने या टुर्नामेंटमधील उपांत्य फेरीत आधीच आपले अव्वल स्थान कायम केले आहे. पाच देशांचा समावेश असलेल्या या टुर्नामेंटच्या राऊंड रॉबिन टप्प्याच्या अखेरीस भारत १० गुण मिळवून फलकावर सवार्ेच्च स्थानी आहे. त्यानंतर कोरिया (सहा), जपान (पाच), पाकिस्तान (दोन) आणि यजमान बांगलादेश (शून्य) यांचा क्रमांक आहे. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे. टुर्नामेंटच्या प्रारंभीच्या सामन्यात कोरियाने भारताला ड्रॉवर रोखले होते. परंतु, मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टीमने बांगलादेशला ९-० ने लोळवून परिस्थिती बदलली. त्यानंतर भारताने आपला कायमस्पर्धी पाकिस्तानलाही पराभूत केले आणि आता जपानवरही मात केली. भारताच्या उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी टीमबाबतचा अद्याप निर्णय व्हायचाय आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …