भंडारा – राज्य सरकार हे दारू विकणाºयांचे सरकार आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले आहे, असा आरोप देखील फडणवीसांनी यावेळी केला. फडणवीस सध्या भंडारा दौºयावर असून, भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
कोरोनाच्या आर्थिक मदतीवरून देखील फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, ‘कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवरील ५० टक्के कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकणाºयांचे सरकार आहे,’ असा गंभीर आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
लाखणी येथे उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता, देवेंद्र फडणवीस यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. हे सरकार सामान्य माणसांचे नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खाली आणू शकता, असे सांगतानाच हे सरकार हरवले असून शोधून देणाºयास पुरस्कार देऊ, असे फडणवीस म्हणाले. दिव्य मराठीने शुक्रवारी सरकार हरवले आहे. या मथळ्याखाली राज्य सरकारवर खुलासा केला होता. त्याच मथळ्याचा वापर आज देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केला आहे, असे सांगतानाच नाना पटोले म्हणतात संविधान खतरे में है. असे म्हणतात. मात्र, धान पीक घेणारे शेतकरीच खरे खतरे में है, असा हल्लाही त्यांनी चढवला. आम्ही ५ वर्षांत एकाही शेतकºयांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर ४ शेतकºयांनी वीज भरली नाही, तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे. असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
2 comments
Pingback: one up shroom bar
Pingback: 토렌트 다운